लॉकडाउनच्या काळात ब्रेकअप झाल्यास 'या' पद्धतीने स्वत:ला सांभाळा

प्रेमाचे नाते अचानक संपल्यास स्वत:ला सांभाळणे मुश्किल होऊन जाते. खासकरुन सध्या कोरोनाच्या परिस्थितीत ज्यांचे ब्रेकअप झाले असल्यास त्यांना त्यामधून सावरणे थोडे कठीण होऊ शकते.

Break Up (Photo Credits-Pixabay)

ब्रेकअप नंतरच्या दु:खातून बाहेर येणे अतिशय त्रासदायक असते. प्रेमाचे नाते अचानक संपल्यास स्वत:ला सांभाळणे मुश्किल होऊन जाते. खासकरुन सध्या कोरोनाच्या परिस्थितीत ज्यांचे ब्रेकअप झाले असल्यास त्यांना त्यामधून सावरणे थोडे कठीण होऊ शकते. परंतु अशा वेळी घरात राहून राहून जुन्या गोष्टींकडे लक्ष वेधले जाऊ शकते. साधारण ब्रेकअप नंतर त्यामधील दु:खातून बाहेर येण्यासाठी जगातील लोक स्वत:ला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतात. मित्रमैत्रींना भेटणे, त्यांच्यासोबत बाहेर फिरायला जाणे, छंद जोपासणे अशा गोष्टी करतात. मात्र लॉकडाउनच्या काळात या सर्व गोष्टी करणे शक्य नाही आहे. त्यामुळे घरात राहून तुम्हाला स्वत:ला सावरणे अत्यंत गरजेचे आहे.

लॉकडाउनच्या काळात घराबाहेर पडता येत नाही तर काय झाले. परंतु भुतकाळातून आपण स्वत:ला सावरणे अत्यंत गरजेचे आहे. तर सध्याच्या लॉकडाउनमध्ये प्रेरक चित्रपटांची लिस्ट बनवून त्या ऑनलाईन पहा. त्यामुळे जुन्या गोष्टी बाजूला सारत तुम्ही त्यामध्ये गुंतून रहाल. ऐवढेच नाही तर एखाद्या कामात स्वत:ला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा.(Relationship Tips: सोशल मीडियात तुमचे प्रेम खुल्या पद्धतीने व्यक्त करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी)

 मित्रमैत्रींणा भेटणे शक्य नसल्यास त्यांच्यासोबत फोनवरुन बातचीत करा. मित्रमैत्रींसोबत तुमचे दु:ख सांगा पण वारंवार त्याच गोष्टीबाबत बोलणे टाळा. शक्य तेवढ्या लवकर जुन्या गोष्टी विसरुन नव्याने सुरुवात कशी करता येईल याचा विचार करा. तसेच उत्तम पुस्तके वाचा त्यामुळे तुमच्यात सकारात्मक उर्जा निर्माण होऊन तुमच्या विचारांना चालना मिळेल.(Dating Tips: मुलींना त्यांच्याबद्दल 'या' गोष्टी ऐकायला खूप आवडतात; मुलांनी नक्की जाणून घ्या)

सध्या बदलत्या काळानुसार लोक सुद्धा बदल असून नव्या ट्रेन्डनुसार रिलेशनशिपसाठी पार्टनरचा शोध डेटिंग अॅपच्या माध्यमातून घेतला जातो. त्यामुळे जर तुमचे ब्रेकअप झाल्यास जुन्या दु:खातून बाहेर येण्यासाठी डेटिंग अॅपचा फायदा घेऊ शकता. त्यामुळे तेथे जर तुम्ही नवी मित्र जोडल्यास तुमचे मन हलके सुद्धा होईल.