Horoscope Today आजचे राशीभविष्य, गुरुवार 25 मे 2023: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

आजचे राशीभविष्य, गुरुवार 25 मे 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशींच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

राशी भविष्य- (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

Horoscope Today 25 May 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, गुरुवार 25 मे 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशींच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष (Aries Horoscope Today): आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. थोडा अशक्तपणा जाणवेल. जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे.

शुभ उपाय- शंकराची पूजा करा.

शुभ दान- अन्नदान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- केशरी

वृषभ (Taurus Horoscope Today): आजचा दिवस तुम्हाला आनंदी ठेवेल. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीकडून लाभलेली साथ भविष्यात फायदेशीर ठरेल.

शुभ उपाय- देवाला केशर दुधाचा नैवेद्य दाखवा.

शुभ दान- गरजूंना आर्थिक मदत करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- गुलाबी

मिथुन (Gemini Horoscope Today):  मिथुन राशीतील व्यक्तींनी आज प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. शक्य असल्यास प्रवास टाळा. पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका. कोणत्याही नवीन कामाचे आज नियोजन करू नका.

शुभ उपाय- गाईला चारा द्या.

शुभ दान- तांदूळ दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- पांढरा

कर्क (Cancer Horoscope Today): आजचा दिवस मिश्र असेल. घर-जमिनीसंदर्भातील समस्या निर्माण होण्याची शक्यता. रखडलेली कामे पूर्ण वेळेत पूर्ण करा. आजूबाजूच्या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. कुटुंबाची काळजी घ्या.

शुभ उपाय- दही खाऊन घराबाहेर पडा.

शुभ दान- गरीबांना अंथरुण दान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- करडा

सिंह (Leo Horoscope Today): आज घरातील वातावरण ताणतणावाचे राहील. जवळच्या व्यक्तीचे मन दुखावले जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे जिभेवर ताबा ठेवा. रागावर नियंत्रण असुदे.

शुभ उपाय- घरात धुपबत्ती करुन पूजा करा.

शुभ दान- शक्य असल्यास रक्तदान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- गुलाबी

कन्या (Virgo Horoscope Today): कन्या राशीतील व्यक्तींना आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवण्यासाठी योग्य दिवस. मात्र विचारपूर्वक निर्णय घ्या. व्यवसायात वृद्धी होईल. नोकरीच्या ठिकाणी आनंदाची बातमी मिळेल. घरातील मंडळींची साथ लाभेल.

शुभ उपाय- लक्ष्मीची पूजा करा.

शुभ दान- ब्राम्हणाला दक्षिणा द्या.

शुभ अंक- 3

शुभ रंग- क्रिम कलर

तुळ (Libra Horoscope Today): तुळ राशीतील व्यक्तींचा आजचा दिवस उत्साहात जाईल. मित्र परिवारासह बाहेर जाल. रखडलेली कामे होती. आई-वडिलांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल.

शुभ उपाय- कुलदेवतेची पूजा करा.

शुभ दान- पाळीव प्राण्याचा अन्न द्या.

शुभ अंक- 1

शुभ रंग- पिवळा

वृश्चिक (Scorpio Horoscope Today): आज कंबरदुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. तब्येतीकडे दुर्लश्र करु नका. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल. जिभेवर नियंत्रण ठेवा.

शुभ उपाय- देवाला चाफ्याच्या फुलांचा हार घाला.

शुभ दान- लाल रंगाचे वस्त्र दान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- आकाशी

धनु (Sagittarius Horoscope Today): आज प्रेमप्रकरणी चुका होणार नाही याची दक्षता घ्या. जवळच्या व्यक्तीचे मन दुखावले जाण्याची शक्यता. वादविवाद टाळा नाहीतर नक्कीच पश्चाताप होईल. घरातील मंडळींचे सल्ले फायद्याचे ठरतील. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या.

शुभ उपाय- सकाळी उठल्यावर देवाचे नामस्मरण करा.

शुभ दान- गाईला चारा द्या.

शुभ अंक- 6

शुभ रंग- जांभळा

मकर (Capricorn Horoscope Today): आजचा दिवस उत्तम असणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. व्यवसायातही प्रगती होईल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता. कुटुंबासाठी आर्थिक बाबींचे नियोजन करण्यासाठी चांगला दिवस.

शुभ उपाय- पक्षांना अन्नदान करा.

शुभ दान- गरजूंना पांढऱ्या रंगाचे वस्त्र दान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- पोपटी

कुंभ (Aquarius Horoscope Today): आजच्या दिवसाची सुरुवात उत्तम होणार नाही. परंतु काळजीपूर्वक कामे केल्यास चुका होण्याची शक्यता टळेल. चिडचिडपणा वाढेल मात्र नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. आत्मविश्वास बाळगल्यास दुपारनंतर कामे पूर्ण होतील. खर्चावर नियंत्रण देवा.

शुभ उपाय- सरस्वतीचे पूजन करा.

शुभ दान- दही-भाताचे दान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- जांभळा

मीन (Pisces Horoscope Today): आज घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत, परंतु त्यावर वाद घालू नका. जवळच्या व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरेल. आळशीपणामुळे कोणतेही महत्वाचे काम टाळू नका. मित्र-मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे.

शुभ उपाय- वाहत्या पाण्यात नारळ सोडा.

शुभ दान- कोणत्याही गोड पदार्थाचे दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- निळा

Tags

Akash Madhwal Cameron Green Chris Jordan Deepak Hooda IPL 2023 IPL 2023 Eliminator Ishan Kishan Jason Behrendorff Krishnappa Gautam Krunal Pandya Kumar Karthikeya Lucknow Super Giants Lucknow Super Giants vs Mumbai Indians Marcus Stoinis MI vs LSG Mohsin Khan Mumbai Indians Naveen-ul-Haq Nehal Vadhera Nicholas Pooran Piyush Chawla Prerak Mankad Quinton de Kock Ravi Bishnoi Rohit Sharma SURYAKUMAR YADAV Tim David Yash Thakur आकाश मधवाल आयपीएल 2023 आयपीएल 2023 एलिमिनेटर इशान किशन एमआय विरुद्ध एलएसजी कुमार कार्तिकेय कृणाल पंड्या कृष्णप्पा गौतम कॅमेरून ग्रीन क्विंटन डी कॉक ख्रिस जॉर्डन जेसन बेहरेनडॉर्फ टिम डेव्हिड दीपक हुडा नवीन-उल-हक निकोलस पूरन नेहल वढेरा पियुष चावला प्रेराक मंकड मार्कस स्टॉइनिस मुंबई इंडियन्स मोहसीन खान रा. यश ठाकूर रोहित शर्मा लखनौ सुपर जायंट्स लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर 2022 एलिमिनेटर सूर्यकुमार यादव