थंडीच्या दिवसात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्या 'हे' आरोग्यदायी सूप

त्यामुळे थंडीच्या दिवसात हे आरोग्यदायी सूप प्या आणि तंदुरुस्त राहा.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

थंडीमध्ये वारंवार भूक लागल्याने खाण्याकडे लक्ष लागून राहते. परंतु भूक संपविण्यासाठी फास्टफुड किंवा तळलेले पदार्थ खाणे धोक्याचे ठरते. अशावेळी आरोग्यदायी सूप दररोज प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

त्याचसोबत सर्दी, खोकला आणि व्हायरल आजार होण्यापासून बचाव होतो. तसेच सूपमधील पौष्टिक तत्व शारिरातील रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ही मदत होते.  त्यामुळे थंडीच्या दिवसात हे आरोग्यदायी सूप प्या आणि तंदुरुस्त राहा.

1. पालक सूप

पालक मध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. तसेच खजिन, विटामिन आणि अन्य पोषक तत्व पालकमध्ये आढळून येतात. त्यामुळे थंडीच्या दिवसात पालक सूप पिणे आरोग्यास उत्तम असते. विटामिन ए, सी, ई, के आणि बी सारखी तत्व असतात.

2. हिरवा वाटाणा सूप/ मटर सूप

थंडीत मटर सूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. हे सूप प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि जास्त काळ भूक ही लागत नाही. वाटाण्यामधील पोटॅशिअम हे शरीरातील बंद झालेल्या शरीरातील पेशी मोकळ्यास मदत होते. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो. तसेच रक्तदाब आणि हृदयविकार असणाऱ्या रुग्णांसाठी हे उत्तम असते.

3. मक्याचे सूप

ज्या व्यक्तींना फुफ्फुस संबंधित आजार असतात त्यांच्यासाठी मक्याचे सूप गुणकारी असते. तर थंडीत मक्याचे सूप प्यायल्याने प्रदुषणामुळे होणारे आजार दूर राहतात. तसेच उच्च ताण कमी करुन हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण कमी होते. फुफ्फुसे तंदुरुस्त राहण्यास मदत होते.

4. टोमॅटो सूप

टोमॅटो सूप हे सर्वांनाच आवडते. विटामिन सी आणि ए भरपूर प्रमाणात असल्याने कॅलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. थंडीत हे सूप प्यायल्याने त्यातील लाईकोपीन  तत्व शरीरातील चरबी कमी करते. तसेच शरीरातील रक्ताची कमतरता सुद्धा भरुन काढून रक्त प्रवाह  सुरळीत राहतो.