Monsoon Tips for Car: पावसात कार चालविण्यापूर्वी 'या' गोष्टींकडे चुकूनही करु नका दुर्लक्ष

कारण धो-धो पावसात आपल्याला गाडी बाजूला लावून कारमध्ये झालेला बिघाड तपासणेही अवघड होते.

Rains (Photo Credits: ANI)

पावसात (Monsoon) छान आपल्या 4 व्हिलर कार मध्ये आपल्या प्रिय व्यक्तीसोबत लाँग ड्राईव्हला जावे अशी अनेकांची इच्छा असते. तसेच अनेक जण पावसात कामानिमित्त आपल्या कारमधून घराबाहेर पडतात. पण अनेकदा पावसात वातावरणात आलेल्या थंडाव्यामुळे कारही थंड पडते आणि त्यामुळे अनेक तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता असते. अशा वेळी पावसात कारमधून निघण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींची खात्री करून घेणे फार गरजेचे आहे. अन्यथा प्रवासादरम्यान कारमध्ये तांत्रिक समस्या निर्माण होई शकतात. यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे.

कारच्या टायरपासून बॅटरी पर्यंत सर्वच गोष्टी नीट तपासून घेणे फार महत्वाचे असते. कारण धो-धो पावसात आपल्याला गाडी बाजूला लावून कारमध्ये झालेला बिघाड तपासणेही अवघड होते.

कारमधून प्रवास करण्यापूर्वी 'या' गोष्टींची घ्या काळजी:

1. टायर- टायरमधील हवा आणि ते योग्य स्थितीत आहे का याची तपासणी करणे.

2. बॅटरी- कारची बॅटरी योग्य स्थितीत काम करते आहे की नाही ते तपासणे.

हेदेखील वाचा- Monsoon Tips for Car: पावसात कार चालविण्यापूर्वी 'या' गोष्टींकडे चुकूनही करु नका दुर्लक्ष

3. वायपर- कारचे वायपर व्यवस्थितरित्या काम करत आहे का ते पाहणे. जर वायपर ब्लेड्स नीट काम करत नसतील तर पावसात गाडी चालवताना अनेक समस्या निर्माण होतात.

4. ब्रेक- गाडीचा ब्रेक चांगल्या स्थितीत आहे की नाही ते तपासणे. ब्रेक पेड्स नीट स्वच्छ करा. यावर नवीन ब्रेक शू लावणे उत्तम.

5. लाइट्स- कारच्या सर्व हेडलाइट्स चालू आहे की नाही ते तपासणे. कारण पावसात अनेकदा धुकं पडतं. अशा वेळी रस्ता धुसर दिसतो. त्यामुळे लाइट्स सतत चालू ठेवाव्या लागतात.

त्याचबरोबर तुमच्या गाडीतील एसीचे नीट कुलिंग होते की नाही ते पाहणे. कारण पावसामुळे कारच्या काचेवर बाष्प जमा होते. असा वेळी एसी चालू असेल तर जास्त काळ काचेवर राहत नाही.