IPL Auction 2025 Live

Winter Health Tips: घसादुखी वर 'हे' झटपट घरगुती उपाय नक्की येतील कामी

अशा वेळी मग यावर त्वरित काय उपाय करता येईल अशा प्रश्न अनेकदा पडतो. म्हणूनच यावर झटपट घरगुती उपाय कोणते करता येईल ते पाहूया

Throat Infection (Photo Credits: PixaBay)

ऋतू बदलले की शरीराच्या अनेक समस्या उद्भवतात. तसेच थंडीत अंगदुखी, पाठदुखीसोबत घसा खवखवणे, घसा दुखणे असे आजार देखील उद्भवतात. अशा वेळी आपल्याला कधी कधी गिळताना, बोलताना घशाला त्रास होतो. यालाच Throat Infection असेही म्हणतात. साधारणत: सर्दी, खोकला याप्रमाणे हा घशाला होणारा त्रास हे देखील व्हायरल इन्फेक्शन आहे. हे इन्फेक्शन काही दिवसांत आपोआप कमी होते.

मात्र यामुळे याच्यावर काही इलाज करु नये असेही नाही. त्या समस्येकडे लक्ष न दिल्यास घशाला सूज येणे, टॉन्सिल्स लाल होणे, त्यावर पांढरे चट्टे येणे यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. अशा वेळी

मग यावर त्वरित काय उपाय करता येईल अशा प्रश्न अनेकदा पडतो. म्हणूनच यावर झटपट घरगुती उपाय कोणते करता येईल ते पाहूया

1. घशाला सूज उतरवण्यासाठी गरम पाणी पिण्याचे व हळद मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करता येतील.

2. घसा दुखत असल्यास तोंडात आल्याचा तुकडा ठेवल्यास थोडा आराम मिळतो.

हेदेखील वाचा- Winter Health Tips:हिवाळ्यात अनेक रोगांपासून दूर राहण्यासाठी गुणकारी 'कडुलिंब'; जाणून घ्या 10 महत्त्वाचे फायदे

3. आलं, टोमॅटो आणि मधाचा रस एकत्र करुन घेतल्याने घसादुखीपासून आराम मिळतो.

4. मध आणि कांदा टाकून उकळलेलं पाणी गाळून ते थोड्या-थोड्या वेळाने प्यावे.

5. पाण्यात बडीशेप टाकून ते पाणी उकळून घ्यावं आणि त्यानंतर त्यात मध टाकून हे पाणी थोड्या थोड्या वेळाने प्यावे. याने घशाला आराम मिळेल.

याप्रमाणेच लिंबाचा रस आणि मध टाकलेले गरम पाणी प्यायल्यानेही घशाला आराम मिळतो. लवंग चघळल्यानेही घसादुखी कमी होते. थंडीत तुम्हाला जर तुम्हाला घसादुखीचा त्रास उद्भवत असेल तर हे उपाय नक्कीच मदत करतील.