चहामध्ये साखर वापरण्यापेक्षा मध का उत्तम? जाणून घ्या कारण
तसेच प्रत्येकाला त्याच्या स्वादानुसार चहामध्ये साखरेचे प्रमाण किती असावे यासाठी सुद्धा साखरेचे छोटे पॅकेटस टेबलवर ठेवलेले असतात.
घराच्या बाहेर जर तुम्ही कधी चहा पिण्यास गेल्यास तेथे तुम्हाला त्यामध्ये साखरेचे क्युब्स टाकून दिले जातात. तसेच प्रत्येकाला त्याच्या स्वादानुसार चहामध्ये साखरेचे प्रमाण किती असावे यासाठी सुद्धा साखरेचे छोटे पॅकेटस टेबलवर ठेवलेले असतात. मात्र आता 6 महिन्यानंतर भारतात साखरेऐवजी मधाचे खडे बाजारात उपलब्ध होणार आहेत. सध्या साखर आरोग्यासाठी किती हानिकारक आहे याबाबत बोलले जात आहे. यामध्येच साखरेच्या ऐवजी मध हा हेल्दी ऑप्शन म्हणून वापरला जाऊ शकतो.
भारत सरकारने खादी ग्रामद्योग आयोगाला मधाचे खडे बनवण्याचे काम करण्यास सांगितले असून ते सुरु झाले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत याबाबत अधिक माहिती दिली आहे. भारत क्राफ्ट या नावाने एक ई-कॉमर्स पोर्टल सुद्धा सुरु करणार आहेत. या पोर्टलवर एमएमएमईचे सर्व उत्पादन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. तर जाणून घ्या चहामध्ये साखर ऐवजी मध वापरल्यास त्याचे काय फायदे होतात.(Health Tips: सीताफळाच्या या '5' गुणकारी फायदयांपासून तुम्ही आहात का अजाण? जाणून घ्या सविस्तर)
शरीरावर सफेद साखरेचा परिणाम होत असल्याबाबत सांगण्यात आले आहे. त्यामुळे मध हा उत्तम पर्याय असून व्यक्ती त्याच्या सोईनुसार मधाचा चहामध्ये वापर करु शकतो. तसेच मध हे आरोग्यासाठी उपयुक्त मानले जाते. सफेद साखरेत जवळजवळ 30 टक्के ग्लुकोज आणि 40 टक्के फ्रॅक्टोज असते. तर मधात स्टार्ची फायबर डेक्सट्रिन असते. त्याचसोबत विटामीन सी, मिनिरल्स, अमिनो अॅसिड्स सारखे तत्व असतात. तसेच सर्दी- ताप, खोकला यावर सुद्धा मध गुणकारी आहे.