COVID-19 Antibody Test: कोव्हिड 19 ला रोखण्यासाठी रॅपिड अॅन्टीबॉडी टेस्ट कशी मदत करणार?
त्यामु:ळे जाणून घ्या नक्की अॅन्टी बॉडी टेस्ट कोरोनाच्या जागतिक आरोग्य संकटामध्ये कशी मदत करू शकते?
महाराष्ट्रासह भारतामध्ये कोव्हिड 19 आजाराची दहशत पसरून आता महिन्याभरापेक्षा जास्तचा काळ उलटला आहे. जगभरात थैमान घालणार्या कोरोनाला रोखण्यासाठी अद्याप कोणतीही लस, औषध नसल्याने अनेकांना या आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. तर जितकं टेस्टींग वाढेल तितकं या आजाराला रोखण्यासाठी रूग्णांचं वेगाने विलगीकरण करता येईल. त्यामुळे आता कोव्हिडचं वेगाने टेस्टिंग करण्यासाठी विविध कीट्सचा वापर केला जात आहे. प्रामुख्याने कोरोनाची लक्षण असल्यास किंवा त्याच्या संपर्कात आलेल्याची स्वॅब टेस्ट घेऊन कोरोनाचं निदान केलं जात आहे. मात्र यासोबतच आता एक रक्ताची चाचणी करून अवघ्या काही मिनिटांत रूग्णामध्ये कोरोना धोका आहे की नाही? याचं निदान केलं जाऊ शकतं. त्याला अॅन्टी बॉडी टेस्ट म्हणून ओळखलं जातं. सध्या मुंबई सह देशभरात काही भागांमध्ये ही अॅन्टी बॉडी टेस्ट केली जात आहे.
अॅन्टी बॉडी टेस्ट केवळ अंदाज व्यक्त करण्यासाठी वापरली जात असून त्याचा वापर कोरोनाचं निदान करण्यासाठी केल्या जाणार्या टेस्टचा पर्याय नाही. त्यामु:ळे जाणून घ्या नक्की अॅन्टी बॉडी टेस्ट कोरोनाच्या जागतिक आरोग्य संकटामध्ये कशी मदत करू शकते? त्याला सरकारची मान्यता आहे का? आणि ती कुणी करणं आवश्यक आहे.
COVID-19 Antibody Test म्हणजे काय?
COVID-19 Antibody Test ही शरीरात अॅन्टीबॉडीज निर्माण झाल्या आहेत की नाही? याची माहिती देते. याचा फायदा तुम्हांला शरीरात इम्युनिटी निर्माण झाली आहे का? याचे संकेत देतात.
अॅन्टिबॉडीज शरीरात किती दिवस राहु शकतात?
तुम्ही आजारी पडल्यानंतर पहिल्यांदा igM antibodies तयार होतात. त्यानंतर igG antibodies शरीरात असल्यास तुम्ही रोगप्रतिकारशक्ती वाढते. igA antibodies या mucosal membranes मध्ये असतात. शरीरात सामान्यपणे इंफेक्शन झाल्यानंतर अॅन्टिबॉडीज आठवडा ते 20 दिवसात तयार होतात. त्यामुळे टेस्टींगची घाई करणंही तुम्हांला खोट्या आशा दाखवू शकतात.
Antibodies असणं म्हणजे तुम्ही कोव्हिडसाठी रोगप्रतिबंधक आहात?
Antibodies तुमच्या शरीरात आहेत म्हणजे व्हायरस विरूद्ध तुमच्या शरीरात एक प्रतिबंधक क्षमता निर्माण झाली आहे. सध्या यावर अधिक अभ्यास सुरू आहे. पण काही दिवसांसाठी नक्कीच तुमच्यात रोगप्रतिबंधक क्षमता असते.
सध्या ICMR ने रॅपिड अॅन्टिबॉडी टेस्टला भारतामध्ये परवानगी दिली आहे. कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत असलेल्या भागामध्ये रूग्णांना विलग करण्यासाठी ही टेस्ट मदत करत आहे. दरम्यान RT-PCR च्या तुलनेत ही स्वस्त देखील आहे.