Remdesivir म्हणजे काय? देशभरात कमतरता असलेल्या या औषधाचा नेमका उपयोग काय आहे? जाणून घ्या सविस्तर
गंभीर कोरोना रूग्णांच्या उपचारांमध्ये Remdesivir इंजेक्शनचा वापर केला जातो. नोव्हेंबरमध्ये डब्ल्यूएचओने Remdesivir हे कोरोनावरील अचूक उपचार नाही, असं सांगितलं होतं.
देशात सध्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या लाटेत कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, देशात Remdesivir या औषधाविषयी चर्चा वाढली आहे. सध्या बऱ्याच राज्यात या औषधाची कमतरता भासत आहे. यामुळे कोरोना रूग्णांच्या उपचारामध्ये अडचणी येत आहेत. Remdesivir च्या कमतरतेवरून भयंकर लढाई सुरू आहे. ज्या व्यक्तीला रेमेडिसवीरची गरज नाही तो व्यक्तीदेखील या औषधाची खरेदी करत आहे. लोक या औषधासाठी मेडिकल स्टोअरमध्ये वारंवार फेऱ्या मारत आहेत. परंतु, तरीही लोकांना हे औषध मिळत नाही.
Remdesivir म्हणजे काय?
हे एक अँटीव्हायरल औषध आहे. हे औषध अमेरिकन औषधनिर्माण संस्था गिलियड सायन्सेस यांनी उत्पादित केले आहे. Remdesivir हेपेटायटीस सी आणि श्वसन विषाणू (आरएसव्ही) च्या उपचारांसाठी सुमारे दशकांपूर्वी तयार केले गेले होते. परंतु याला बाजारात मंजूरी मिळाली नाही. सध्याच्या परिस्थितीत Remdesivir कडे आयुष्य वाचवणारे औषध म्हणून पाहिले जात आहे. आता लोक जास्त किंमतीतदेखील रेमेडिसिव्हिर इंजेक्शन खरेदी करण्यास तयार आहेत. गंभीर कोरोना रूग्णांच्या उपचारांमध्ये Remdesivir इंजेक्शनचा वापर केला जातो. नोव्हेंबरमध्ये डब्ल्यूएचओने Remdesivir हे कोरोनावरील अचूक उपचार नाही, असं सांगितलं होतं. (वाचा - Remdesivir महाराष्ट्राला मिळू नये यासाठी भाजपकडून औषध कंपन्यांचे वकिलपत्र - नवाब मलिक)
कोरोना संकटानंतर Remdesivir च्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. हे औषध भारतात सिप्ला, झाइडस कॅडिला, हेटरो, मायलन, ज्युबिलंट लाइफ सायन्सेस, डॉ. रेड्डीज, सन फार्मा अशा अनेक कंपन्यांनी उत्पादित केले आहे. गिलियड सायन्सेस या कंपनीने रेमेडिसिव्हिरला इबोला औषध म्हणून विकसित केले. परंतु आता असा विश्वास आहे की, त्यातून अधिक विषाणू मरतात. सध्या कोरोना व्हायरसवरील उपचारासाठी Remdesivir चा वापर वाढला आहे.
Remdesivir ची कमतरता का आहे?
देशातील कोरोनाच्या दुसर्या लाटेत रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यावेळी कोरोनाच्या उपचारासाठी Remdesivir ची मागणी वाढली आहे. मागील वर्षाच्या अखेरीस, कोरोनाची नवीन प्रकरणे कमी झाल्यानंतर Remdesivir औषधाचे उत्पादन कमी झाले. गेल्या 6 महिन्यांत भारताने 10 लाखांहून अधिक रॅमिडिसीव्हिर इंजेक्शन इतर देशांमध्ये निर्यात केले होते. देशात Remdesivir कमतरतेचे आणखी एक कारण म्हणजे रेमाडेसिव्हिर इंजेक्शनची ब्लॅक मार्केटिंगची समस्या.
सरकारने किंमत केली कमी -
कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे रुग्णांच्या उपचारासाठी केंद्र सरकारने Remdesivir च्या किंमतीत मोठी सूट दिली आहे. केंद्र सरकारने रेमेडिसवीरच्या किंमतीत सुमारे पन्नास टक्क्यांची कपात केली आहे. या औषधाची किंमत दोन हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. या इंजेक्शनची किंमत 2,450 रुपये आहे. कपातीनंतर Remdesivir इंजेक्शन 1225 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.
(The above story first appeared on LatestLY on Apr 18, 2021 12:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

