कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांना COVID-19 Vaccine एकच डोस पुरेसा; अभ्यासातून खुलासा

कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या व्यक्तींसाठी कोविड-19 लसीचा एकच डोस पुरेसा असल्याचे हैद्राबाद मधील AIG Hospital च्या अभ्यासातून समोर आले आहे.

COVID-19 Vaccine (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग झालेल्या व्यक्तींसाठी कोविड-19 लसीचा (Covid-19 Vaccine) एकच डोस (Single Dose) पुरेसा असल्याचे हैद्राबाद (Hyderabad) मधील AIG Hospital च्या अभ्यासातून समोर आले आहे. 16 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान लस घेतलेल्या 260 आरोग्य कर्मचाऱ्यांवर हॉस्पिटलने अभ्यास सुरु केला होता. त्यामधील कोरोनाची लागण होऊन गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीची चाचणी करण्यात आली. या सर्वांना कोविशिल्ड (Covishield) लस देण्यात आली होती.

कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींमध्ये लसीचा एकच डोस घेतल्यानंतर इतर व्यक्तींपेक्षा अधिक चांगला अॅंटीबॉडी रिस्पॉन्स दिसून आला, ही माहिती इंटरनॅशनल जरनल ऑफ इंफेक्शियस डिजीस यामध्ये छापून आली आहे. (COVID-19 Vaccine Update: भारत बायोटेक ची COVAXIN कोरोना व्हायरसच्या Beta आणि Delta व्हेरिएंटवर प्रभावी)

यासोबत कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींमध्ये लस घेतल्यानंतर इतर व्यक्तींपेक्षा मेमरी T-Cell रिपॉन्स अधिक दिसून आला. कोरोनाची लागण झाल्याच्या 3-6 महिन्यानंतर लस घेतल्यास अधिक रोगप्रतिकारक शक्ती दिसून येते. कोविड-19 होऊन गेलेल्या व्यक्तींनी जर लसीचे दोन्ही डोस घेतले तर त्यांना कोरोनाची पुन्हा लागण होणे शक्यच नाही, असे अभ्यासातून समोर आले आहे.

"कोविड-19 झालेल्या व्यक्तींना लसीचे दोन्ही डोस घेण्याची गरज नाही. फक्त एका डोसनंतरही त्यांच्यामध्ये कोरोना विरुद्ध लढण्यासाठी चांगली रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. लसींचा तुटवडा असेल तेव्हा आपण या अभ्यासाचा वापर करु शकतो," असे  AIG Hospital चे चेअरमन डॉ. नागेश्वर रेड्डी यांनी सांगितले आहे.

इतर नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाल्यानंतर आणि लसीचा पुरवठा पुर्ववत झाल्यानंतर अशा रुग्णांनी लसीचा दुसरा डोस देता येईल. सध्या देशातील अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे, हा आमचा मानस आहे, असे रेड्डी म्हणाले.

लसीकरणाच्या पद्धतीमध्ये आपल्याला बदल करण्याची गरज आहे. कमी काळात अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे, यासाठी आपण या अभ्यासाचा वापर करु शकतो, असेही त्यांनी सांगितले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif