Plant-Derived Antiviral: कोरोनावर उपचार करण्यासाठी शास्त्रज्ञांनी शोधले वनस्पतीपासून तयार केले औषध; अगदी Delta Variant वरही ठरले प्रभावी

तीनपैकी, डेल्टा प्रकाराने पेशींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढण्याची सर्वोच्च क्षमता दर्शविली. तो थेट शेजारच्या पेशींमध्येही पसरू शकतो.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

सध्या कोरोना विषाणूवर (Coronavirus) लस हेच एक महत्वाचे औषध मानले जात आहे. जगामध्ये या व्हायरसला मात देण्यासाठी प्रभावी अशा औषधाबाबत संशोधन चालू असताना, वनस्पती-आधारित अँटीव्हायरल (Plant-Derived Antiviral) उपचार कोरोनाव्हायरसच्या सर्व व्हेरिएंटवर, अगदी अत्यंत संसर्गजन्य डेल्टा प्रकारांनाही रोखण्यात प्रभावी असल्याचे आढळले आहे. यूकेमधील नॉटिंगहॅम विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या संसोधनात हे समोर आले आहे. आपल्या रिसर्चमध्ये शास्त्रज्ञांना आढळून आले की, डेल्टा वेरिएंट हा इतर स्ट्रेनपेक्षा पेशींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढतो आणि जवळच्या पेशींना संक्रमित करतो.

शास्त्रज्ञांनी पुढे म्हटले आहे की, जर दोन भिन्न SARS-CoV-2 व्हेरिएंटचा संसर्ग झाला असल्यास,  डेल्टा प्रकार त्याच्या सह-संक्रमित भागीदार प्रकारालाही वाढवतो. अभ्यासात असेही दिसून आले आहे की, मूळ SARS-CoV-2 सह इतर व्हायरसला ब्लॉक करण्यासाठी शास्त्रज्ञांच्या गटाने थॅप्सिगार्गिन (Thapsigargin-TG) नावाचे नवीन नैसर्गिक अँटीव्हायरल औषध शोधले आहे. हे औषध डेल्टा व्हेरियंटसह सर्व नवीन SARS-CoV-2 प्रकारांवर उपचार करण्यासाठी प्रभावी ठरले आहे.

टीमने आपल्या मागील अभ्यासात दाखवले की, वनस्पतीपासून तयार केलेले अँटीव्हायरल (अगदी कमी डोसमध्ये), SARS-CoV-2 सह तीन प्रमुख प्रकारच्या मानवी श्वसन विषाणूंविरूद्ध एक अत्यंत प्रभावी आहे. हे औषध शरीराचा  रोगप्रतिकारक प्रतिसाद ट्रिगर करते. व्हायरलन्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या ताज्या अभ्यासात, टीमने SARS-CoV-2 ची उदयोन्मुख रूपे- अल्फा, बीटा आणि डेल्टा एकमेकांच्या सापेक्ष पेशींमध्ये सिंगल व्हेरिएंट इन्फेक्शन म्हणून किती चांगल्या प्रकारे वाढू शकतात हे शोधण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा: World Pneumonia Day: न्यूमोनिया आजाराची लक्षणे आणि प्रकार, घ्या जाणून)

या प्रकारांना रोखण्यासाठी TG किती प्रभावी आहे हे देखील टीमला जाणून घ्यायचे होते. तीनपैकी, डेल्टा प्रकाराने पेशींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढण्याची सर्वोच्च क्षमता दर्शविली. तो थेट शेजारच्या पेशींमध्येही पसरू शकतो. संक्रमणाच्या 24 तासात त्याचा वाढीचा दर अल्फा व्हेरियंटच्या चार पट आणि बीटा प्रकाराच्या नऊ पट होता.