PhonePe Introduces Health Insurance: डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या आजारांसाठी 59 रुपयांमध्ये मिळणार विमा; फोनपेने सादर केली योजना, जाणून घ्या किती मिळेल कव्हरेज
तुम्ही फोनपे ॲपवर विमा श्रेणीमध्ये जाऊन हा विमा खरेदी करू शकता.
हवामान बदलले की डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव वाढू लागतो. अशा परिस्थितीत उपचारांसाठी लोकांचा खिसा मोकळा होतो, पण आता हा आर्थिक बाबींचा त्रास दूर करण्यासाठी डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म फोनपेने एक नवीन विमा योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये डेंग्यू आणि मलेरियाच्या उपचारांसाठी सर्वसमावेशक कव्हरेज केवळ. हे कव्हरेज 59 रुपये प्रति वर्ष उपलब्ध आहे. फोनपेची ही परवडणारी आरोग्य कव्हरेज योजना वेक्टर आणि वायुजन्य रोगांशी संबंधित वैद्यकीय खर्च कव्हर करेल. यामध्ये 5000 रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळणार आहे.
टायर 2 आणि टियर 3 शहरांवर विशेष लक्ष केंद्रित करून, वर्षभर अशा आजारांमुळे अनपेक्षित वैद्यकीय खर्चापासून फोनपे वापरकर्त्यांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्याचे हे विमा संरक्षण सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. ही योजना फोनपे वापरकर्त्यांना मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, फायलेरियासिस, जपानी एन्सेफलायटीस, स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू, टायफॉइड, फुफ्फुसीय क्षयरोग आणि मेंदुज्वर यासह 10 पेक्षा जास्त वेक्टर-जनित आणि वायुजन्य रोगांविरूद्ध सर्वसमावेशक कव्हरेज देईल.
कव्हरमध्ये हॉस्पिटलायझेशन, डायग्नोस्टिक्स आणि आयसीयु भर्ती देखील समाविष्ट आहे. या व्यतिरिक्त, 100% डिजिटल पद्धतीने दावा केला जाऊ शकतो. यामुळे, विमा करणे आणि दावा घेणे या दोन्हीसाठी वेळ लागणार नाही. फोनपे इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेसचे सीईओ विशाल गुप्ता म्हणतात की, फोनपे च्या या सुविधेचा उद्देश प्रत्येकासाठी विमा सुलभ आणि परवडणारा बनवणे हा आहे. याद्वारे, वापरकर्त्यांना वर्षभर सर्वसमावेशक कव्हरेज दिले जाईल. (हेही वाचा: High-Risk Food Category: पॅकेजमध्ये उपलब्ध असलेले पाणी, तसेच मिनरल वॉटर ठरू शाकारे आरोग्यासाठी धोकादायक; FSSAI ने ठेवले उच्च जोखीम श्रेणीत)
आपल्या वापरकर्त्यांची आर्थिक अडचण दूर करून आरोग्य धोके कमी करण्याचे, तसेच, डिजिटल प्रक्रियेद्वारे देशभरातील वंचित लोकांना विमा सुविधा उपलब्ध करून देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. तुम्ही फोनपे ॲपवर विमा श्रेणीमध्ये जाऊन हा विमा खरेदी करू शकता. या ठिकाणी पॉलिसी निवडीपासून दावा दाखल करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पूर्ण केली जाऊ शकते. विम्याचा लाभ घेण्यासाठी, वापरकर्ते फोनपे ॲपमधील विमा विभागात जाऊन, योजनेचा तपशील पाहून काही मिनिटांत पेमेंट प्रक्रिया पूर्ण करू शकतात.