Paxlovid: Pfizer च्या Oral COVID-19 Treatment ला अमेरिकेमध्ये 12 वर्षांवरील नागरिकांसाठी मंजुरी

फायजर कडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, Paxlovid हे औषध 90% हॉस्पिटलायझेशन आणि गंभीर आजाराचा धोका, त्यामधून होणारे मृत्यू रोखण्यास प्रभावी आहे.

Pfizer (Photo Credits: IANS)

जगभरात कोरोना वायरसचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन धुमाकूळ घालत असताना अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनानं Pfizer Oral COVID-19 Treatment ला मंजुरी दिली आहे. Paxlovid असं या औषधाचं नाव असून अमेरिकेत 2 वर्षांवरील नागरिकांसाठी हे औषध मंजुर करण्यात आलं आहे. सध्या होम क्वारंटीन असलेल्यांसाठी हे औषध वापरण्यास परवानगी आहे.

फायजर कडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, Paxlovid हे औषध 90% हॉस्पिटलायझेशन आणि गंभीर आजाराचा धोका, त्यामधून होणारे मृत्यू रोखण्यास प्रभावी आहे. याबाबतचा डाटा कंपनीच्या क्लिनिकल ट्रायल मध्ये देण्यात आला आहे. ताज्या लॅब डाटा नुसार, हे औषध ओमिक्रॉन विरूद्ध देखील प्रभावी असल्याचं फायझर ने म्हटलं आहे.

2200 लोकांवर झालेल्या ट्रायल्स मध्ये फायझर ट्रीटमेंट घेतलेल्यांपैकी कोणाचाही मृत्यू झालेला नाही. जे 12 मृत्यू झाले ते placebo recipients होते. पहिले 5 दिवस फायझरच्या गोळ्या या दर 12 तासांनी घेण्याचा सल्ला आहे. मागील महिन्यांतच त्यांनी अमेरिकेच्या एफडीए कडे आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज केला होता. हे देखील वाचा: Paxlovid, Pfizer ची कोविड 19 अ‍ॅन्टीवायरल गोळी 89% प्रभावी; Omicron Variant च्या संसर्गालाही रोखण्यास सक्षम .

जगात वेगाने पसरणार्‍या ओमिक्रॉन वायरसच्या संसर्गावर जागतिक आरोग्य संघटनेदेखील चिंता व्यक्त केली आहे. अमेरिका आणि ब्रिटन मध्ये कोरोना केसेसची संख्या झपाट्याने वाढत आहे. ब्रिटन मध्ये बुधवारी कोरोना संसर्गाचे रूग्ण 24 तासांत 106122 इतके आढळून आले आहेत. कोरोना संकट सुरू झाल्यापासून आतापर्यंतचा हा उच्चांकी आकडा आहे.