नवरात्रोत्सव 2018 : मधुमेह, रक्तदाब, हृद्यविकाराच्या रूग्णांनी उपवास करताना कोणती काळजी घ्यावी ?
त्यामुळे तुमच्या आरोग्यानुसार कोणता उपवास किती दिवस करावा हे नक्की ठरवा.
नवरात्रीच्या दिवसामध्ये अनेकजण नऊ दिवस सलग उपवास करतात. काही जण केवळ घट उठताना आणि बसवताना उपवास करतात. तर काही जण सलग उपवास करून दशमीच्या दिवशी उपवास सोडतात. नवरात्रोत्सव हा चार्तुमासातील एक सण आहे. या दिवसात शरीरात वात वाढू नये, शरीराला डिटॉक्स करता यावे याकरिता उपवास करण्याची पद्धत आहे. मात्र जर तुम्हांला मधूमेह, उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर उपवासापासून तुम्ही दूर राहणंच अधिक सोयिस्कर आहे. परंतू तुम्हांला उपवास करायचा असेलच तर काही गोष्टींची काळजी घेणं अत्यावश्यक आहे. IRCTC ची खास 'नवरात्री स्पेशल थाळी', प्रवासादरम्यान चाखता येणार लज्जतदार उपवासाच्या पदार्थांची चव !
हृद्यविकार, मधुमेह, उच्च रक्तदाबाचा त्रास असणार्यांनी कोणती काळजी घ्यावी याकरिता Complete Nutrition च्या आहारतज्ञांनी दिलेला हा सल्ला नक्की लक्षात ठेवावा.
मधुमेहींनी उपवास करावा का ?
मधुमेहींनी उपवास करणं हे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीमध्ये चढ उतार होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आहराचं पथ्यपाणी सांभाळत उपवास करा.
उच्च रक्तदाबाच्या रूग्णांनी काय काळजी घ्यावी ?
उपवासादरम्यान औषधांच्या गोळ्यांच्या वेळा डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासून घ्या. तुमचा आहार आणि औषधं याबाबत डॉक्टरांशी बोला.
कॉफी, चहा यांचे अतिसेवन, रिकाम्या पोटी सेवन टाळा
मुबलक प्रमाणात पाणी प्यावे.
रात्रीच्या वेळेस पुरेशी आणि शांत झोप घेणे आवश्यक आहे.
उपवास असताना रिकाम्या पोटी प्रखर उन्हांत फिरणे टाळा.
सकाळ - संध्याकाळ तुमचा रक्तदाब तपासून पहाणं गरजेचे आहे.
हृद्यविकाराचा त्रास असणार्यांनी कोणती काळजी घ्यावी ?
उपवास केल्याने वजन कमी होण्याचा आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचा धोका अधिक असतो. या दोन्ही गोष्टींचा हृद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. परिणामी उपवास रूग्णाला त्रासदायक ठरू शकतो.
मासिकपाळीच्या दिवसात उपवास करावा का ?
मासिकपाळीच्या दिवसात तसेच तापामध्ये मुद्दामून उपवास करणं टाळा. या दिवसांमध्ये शरीरात अशक्तपणा वाढतो. अशावेळेस शरीराला आवश्यक पोषकघटकांची गरज असते.