National Cancer Awareness Day 2023: 'कॅन्सर' बाबत जागृती करण्यासाठी 7 नोव्हेंबरला पाळला जातो खास दिवस; जाणून घ्या या आजाराबद्दल काही फॅक्ट्स

पण आता लाईफस्टाईल मध्ये झालेल्या विचित्र बदलांमुळे त्याचा परिणाम आरोग्यावरही दिसत आहे.

Cancer (PC - pexels)

National Cancer Awareness Day हा दिवस 7 नोव्हेंबर दिवशी पाळला जातो. 'कॅन्सर' या आजाराचं नाव ऐकूनच अनेकांचे अवसान गळतं. त्यामुळे या आजाराबद्दल अधिकाधिक जागृती निर्माण करणं ही गरज बनत चालली आहे. कॅन्सरचे उपचार देशभर पोहचवण्यासाठी National Cancer Control Programme ची सुरूवत 1975 साली करण्यात आली आहे. यासोबतच अन्य काही उपचार पद्धतींवर संशोधन करण्याचे काम इतर प्रोग्रामद्वारा सुरू आहे. कॅन्सर वर मात करण्यासाठी त्याचे निदान लवकर होणं गरजेचे आहे. WHO नुसार, कॅन्सर हा मोठ्या स्वरूपातील आजार आहे ज्यामध्ये तो एका टिश्यू किंवाअवयवामधून सुरू होतो आणि पेशींची अनियंत्रित वाढ होऊन तो शरीरात अन्य ठिकाणी वाढतो.

रिपोर्ट्स नुसार, भारतामध्ये प्रतिवर्षी 1.1 मिलियन नवे रूग्ण समोर येतात. त्यामध्ये 2/3 रूग्ण हे अ‍ॅडव्हान्स स्टेज मध्ये असतात. यामुळे कॅन्सर रूग्णांचा आजारावर मात करण्याचा टक्का कमी होतो. कॅन्सरच्या आजाराबद्दल पुरेशी माहिती नसणं यामुळेच तो लवकर निदान होत नाही. म्हणूनच National Cancer Awareness Day भारतामध्ये पाळणं गरजेचे बनलेलं आहे.

कशी झाली सुरूवात?

सप्टेंबर २०१४ मध्ये भारतातील केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी National Cancer Awareness Day ची सुरुवात केली होती. एक समिती स्थापन करण्यात आली आणि 7 नोव्हेंबर हा दिवस कर्करोगाविषयी लोकांना माहिती आणि शिक्षित करण्याच्या उद्देशाने एक दिवस पाळण्याला सुरूवात झाली. लवकर उपचार झाल्यास कॅन्सरवर मात करता येऊ शकते.

National Cancer Awareness Day 2023 बाबत फॅक्ट्स

World Health Organization च्या रिपोर्टनुसार, International Agency for Research on Cancer चा अहवाल सांगतो एकेकाळी 10 मध्ये एका भारतीयाला आयुष्यात कॅन्सर होत होता आणि 15 मध्ये एखादा दगावत होता. पण आता लाईफस्टाईल मध्ये झालेल्या विचित्र बदलांमुळे त्याचा परिणाम आरोग्यावरही दिसत आहे.