Surgical Mask उलटा घातल्याने Corona Virus पासून बचाव होण्यास अधिक फायदेशीर असल्याचा दावा खोटा! जाणून घ्या तज्ञांचा सल्ला
हा मास्क रंगीत भाग बाहेरच्या बाजूला आणि पांढरा भाग आतल्या बाजूला घालणं अपेक्षित आहे.
कोरोना वायरस (Coronavirus) पासून संरक्षण करण्यासाठी सध्या सातत्याने मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) राखा आणि हात धूत रहा याचा घोषा सुरू आहे. मास्क मुळे नाक आणि तोंड झाकलं जातं आणि वायरसचा ड्रापलेट्सच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करण्याचा थेट मार्ग खुंटतो. सध्या मास्क मध्ये अनेक प्रकार आहेत. पण सर्वसामान्यपणे 3 लेअरचा मास्क परिधान करण्याचा सल्ला दिला जात आहे. यामध्ये तुम्ही जर सर्जिकल मास्क (Surgical Mask) वापरत असाल तर नेमका हा मास्क कसा घालायचा हा अनेकांना प्रश्न पडला असेल. मागील वर्षी या मास्कला विरूद्ध दिशेने (Surgical Mask Inside Out) घातल्यास अधिक प्रभावी ठरू शकतो असा दावा करण्यात आला होता पण तो खोटा होता. Coronavirus: बाजारात 'मास्क' उपलब्ध नसतील तर 'या' सोप्या पद्धतीने बनवा 'घरगुती मास्क': पहा व्हिडिओ.
सर्जिकल मास्क घालण्याची नेमकी योग्य पद्धत कोणती?
दरम्यान सर्जिकल मास्क हा 3 लेयरचा असतो. हा मास्क रंगीत भाग बाहेरच्या बाजूला आणि पांढरा भाग आतल्या बाजूला घालणं अपेक्षित आहे. हा मास्क उलटा घातल्याने तो कमी प्रभावी होत नाही तर तो घालणं सोयीस्कर होत नाही.
सर्जिकल लेअर मधील बाहेरचा भाग हा repellant असतो. मधला भाग हा फिल्टर असतो तर आतला भाग हा मॉईश्चर शोषून घेणारा असतो. तुम्ही खोकताना, बोलताना तोंडातून बाहेर पडणार्या मॉईश्चरला शोषले जाते. त्यामुळे हा मास्क उलटा घालणं हे चूकीचं आहे.
व्हॉट्सअॅप फॉर्वड
सर्जिकल मास्क योग्य पद्धतीने कसा घालायचा?
दरम्यान सध्या भारतामध्ये पुन्हा कोविड 19 रूग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आज मागील 24 तासांतील कोरोनाबाधितांची रूग्णसंख्या पाऊणे तीन लाखांच्या उंबरठ्यावर होती. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. सर्जिकल मास्क एकदा वापरला तर तो फेकून देणं ऊचित आहे. कापडी मास्क केवळ ठराविक वापरानंतर पुन्हा धुवून वापरता येऊ शकतो.मास्क परिधान करताना आणि काढून टाकल्यानंतरही हात स्वच्छ धुणं आवश्यक आहे.