Monkeypox Virus: जगभरात वेगाने पसरत आहे मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग; कारणे आणि लक्षणे जाणून घ्या

या विषाणूची लागण झालेल्या प्राण्याच्या संपर्कात आल्याने हा विषाणू मानवांमध्ये पसरू शकतो.

मंकीपॉक्स/प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Twitter)

Monkeypox Virus: जगभरात कोरोना व्हायरसची (Coronavirus) प्रकरणे कमी झाली आहेत. परंतु, आता मंकीपॉक्स (Monkeypox) जगभरात वेगाने पसरत आहे. या विषाणूने जगातील अनेक देशांमध्ये कहर केला आहे. या विषाणूच्या संक्रमणामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. उंदीर आणि माकडांसारख्या संक्रमित जीवांपासून मानवांमध्ये पसरणाऱ्या या आजाराला मंकीपॉक्स असे नाव देण्यात आले आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO च्या मते, मंकीपॉक्स हा नवीन विषाणू नाही. कारण, मानवांमध्ये त्याची पहिली केस 1970 मध्ये नोंदवली गेली होती आणि आता पुन्हा एकदा जगातील अनेक देशांमध्ये या विषाणूची लागण झालेले रुग्ण भेटू लागले आहेत. शेवटी मंकीपॉक्स म्हणजे काय? त्याची कारणे आणि लक्षणे काय आहेत? या लेखात सविस्तर जाणून घेऊयात... (हेही वाचा - Tomato Flu: केरळमध्ये 'टोमॅटो फ्लू'चा कहर; 5 वर्षांखालील मुले पडत आहेत आजारी; जाणून घ्या लक्षणे)

अमेरिकेत मंकीपॉक्सची पहिली केस -

मंकीपॉक्सचे पहिले प्रकरण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये नोंदवले गेले. जगातील अनेक देशांमध्ये हा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. स्पेनमधून या संसर्गाची 7 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर पोर्तुगालमध्ये मंकीपॉक्सचे 9 नवीन संक्रमित रुग्ण आढळले आहेत.

स्पेन आणि पोर्तुगालमध्ये आढळले नवीन रुग्ण -

त्याचवेळी कॅनडामध्येही मंकीपॉक्स वेगाने पसरत आहे. येथे या संसर्गाचे 13 नवीन संशयित रुग्ण आढळले आहेत.

कॅनडामध्ये संसर्गाची 13 नवीन प्रकरणे -

मंकीपॉक्स म्हणजे काय?

हा एक प्रकारचा विषाणूजन्य संसर्ग आहे, जो उंदीर आणि माकडांद्वारे मानवांमध्ये पसरू शकतो. या विषाणूची लागण झालेल्या प्राण्याच्या संपर्कात आल्याने हा विषाणू मानवांमध्ये पसरू शकतो. हा चेचकांच्या मोठ्या स्वरूपासारखे दिसते आणि त्याची लक्षणे जवळपास सारखीच असतात. प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणारा हा आजार संक्रमित रुग्णाला स्पर्श करून किंवा त्याच्या शिंक आणि खोकल्याच्या संपर्कात आल्याने दुसऱ्या व्यक्तीलाही संक्रमित करू शकतो. याशिवाय संक्रमित व्यक्तीच्या वस्तू वापरूनही हा संसर्ग पसरू शकतो.

मंकीपॉक्स विषाणूजन्य ऑर्थोपॉक्स विषाणूंच्या कुटुंबाशी संबंधित आहे, ज्यामध्ये व्हेरिओला विषाणू देखील समाविष्ट आहे. स्मॉल पॉक्स व्हॅरिओला विषाणूमुळे होतो. तज्ज्ञांच्या मते, मंकीपॉक्सची लक्षणे चेचकांपेक्षा कमी गंभीर असतात.

मंकीपॉक्सची लक्षणे -

शरीरावर गडद लाल पुरळ

असह्य स्नायू वेदना

तीव्र डोकेदुखी

सर्दी

निमोनिया

शारीरिक थकवा जाणवणे

उच्च ताप

शरीरावर सूज

उर्जेची कमतरता जाणवणे

लाल पुरळ

मंकीपॉक्सपासून बचाव कसा करायचा?

या आजाराची लागण झालेली व्यक्ती आठवडाभरात बरी होत असली तरी काही बाधितांमध्ये हा आजार गंभीर अवस्थेत पोहोचतो. तथापि, मंकीपॉक्सवर अद्याप कोणताही अचूक उपचार नाही. अशा परिस्थितीत, संक्रमित रुग्णांमध्ये त्याची लक्षणे कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. उपचारादरम्यान, मंकीपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तीला चेचक विरूद्ध लसीकरण केले जाते. ज्यामुळे हा संसर्ग रोखण्यात मोठ्या प्रमाणात मदत होते.

सावधगिरी म्हणून, या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला वेगळे ठेवले जाते, जेणेकरून त्याच्याद्वारे हा संसर्ग इतर कोणालाही पसरू नये. यासोबतच रुग्णाला मास्क वापरण्याचा आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.