How To Increase Metabolism: चयापचय कसे सुधारावे? इथे आहेत काही महत्त्वाच्या टीप्स

त्यासाठी प्रयत्न करावे लागतातत आणि एक शिस्तही अंगी बाणवावी लागते. एकदा का ती बाणली की तुमचे दुबळे शरीरही योग्य चयापचयाच्या आधारे चांगली उर्जा निर्माण करु शकेल. म्हणूनच ते सुधारण्यासाठी काय करावे, यासाठी इथे दिलेल्या काही टीप्स आपल्याला उपयोगी ठरु शकतात.

Metabolism | Representative Image (Photo Credit- Pixabay)

Importance of a Healthy Lifestyle: सुखी जीवनाचा मार्ग पोटातून जातो, अशी एक म्हण पूर्वंपार चालत आली आहे. ती खाद्यसंस्कृतीच्या अनुषंघाने भाष्य करत असली तरी, ती तुमच्या आहारशास्त्र आणि शारीरिक स्वास्थ्यासाठीही लागू होते. कारण तुम्ही जो आहार घेता त्याचे चयापचय (Metabolism) जर योग्य पद्धतीने झाले तर तुमचे शरीर तंदुरुस्त राहू शकते. चयापचय सुस्थितीत ठेवणे किंवा ते योग्य मार्गावर आणने ही साधी बाब नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतातत आणि एक शिस्तही अंगी बाणवावी लागते. एकदा का ती बाणली की तुमचे दुबळे शरीरही योग्य चयापचयाच्या आधारे चांगली उर्जा निर्माण करु शकेल. म्हणूनच ते सुधारण्यासाठी काय करावे, यासाठी इथे दिलेल्या काही टीप्स आपल्याला उपयोगी ठरु शकतात.

चयापचय कसे सुधाराल? (How To Increase Metabolism)

चयापचय वाढविण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. ज्या तुमच्या जीवनशैलीशी निघडीत असतात. त्या खालील प्रमाणे

सकाळचा सूर्यप्रकाश मिळवा

सूर्यप्रकाशात 15 मिनिटे घराबाहेर घालवल्याने शरीराची सर्कॅडियन लय (Circadian Rhythm) समक्रमित होते. जे चयापचय संप्रेरकांचे नियमन करण्यासाठी आवश्यक आहे. (हेही वाचा, Importance of Metabolism: आरोग्यदायी जीवनशैली आणि चयापचय यांचे महत्त्व काय?)

गुणवत्तापूर्ण झोपेस प्राधान्य

शरीराला गुणवत्तापूर्ण झोप आवश्यक असते. गुणवत्तापूर्ण झोपेमुळे शरीराला चांगली विश्रांती मिळते. त्यामुळे तुमचा (Hormones) समतोल राखला जातो. त्यासाठी आरोग्याचे चयापचय सुधारण्यासाठी चालना मिळते. त्यामुळे आपली जीवनशैलीही सुधारते.

हायड्रेटेड राहा:

शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण योग्य असायला हवे. पुरेसे पाणी सेवेन केल्याने शरीरातील चयापचय क्रिया उत्तेजित होते, पचन आणि पोषक तत्वांचे शोषण होण्यास मदत होते. (हेही वाचा, Health Tips: शरीरातील Metabolism संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी)

प्रोटीनयुक्त आहाराची निवड करा:

जेवणामध्ये प्रथिनयुक्त स्त्रोत समाविष्ठकरा. प्रथिने म्हणजे प्रोटिन्स, जे तुम्हाला डाली, सोयाबीन, मांसाहार, अंडी, दूध अशा आहारातून मिळतात.

इंटरमिटंट फास्टिंग:

संरचित उपवास पद्धती चयापचय आरोग्य वाढवू शकतात आणि कॅलरी सेवन नियंत्रित करून वजन व्यवस्थापनास मदत करू शकतात.

जड आहार टाळा:

अति उष्मांक प्रतिबंधामुळे स्नायूंचे प्रमाण कमी होते आणि चयापचय कार्यक्षमतेत बाधा येते, संतुलित पोषणाच्या महत्त्वावर जोर देते. त्यामुळे जड आहार शक्यतो टाळा.

तणाव व्यवस्थापण महत्त्वाचे:

ताणतणावाचे व्यवस्थापन करा. योग्य विश्रांती, अतिरिक्त ताण टाळणे यांमुळे कॉर्टिसोलची पातळी कमी होते, दीर्घकालीन तणावामुळे चयापचयात बिघाड निर्माण होऊ शकतो.

नियमीत व्यायाम:

नियमित शारीरिक हालचाली, व्यायाम, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी व्यायाम आरोग्यास चांगला असतो. ज्यामुळे चयापचय दर वाढवतो आणि स्नायूसुद्धा भक्कम होतात.

चांगले चयापचय ही शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. ती निसर्गत: शक्यतो चांगलीच असते. मात्र, बदलती जीवनशैली, आहार, कामाचे स्वरुप यामुळे त्यात बदल होतो. जो शिस्तीच्या आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही सुधारु शकता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif