India Fight with Obesity: स्वयंपाक घरात खाद्यतेल वापर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अवाहन

भारतीय नागरिकांनी स्वयंपाकघरात खाद्यतेलाचे सेवन कमी करून लठ्ठपणाशी लढण्यासाठी देशव्यापी प्रयत्न करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. बॉलीवूड अभिनेते, खेळाडू आणि आरोग्य तज्ञ यांनीही निरोगी भारताच्या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.

Narendra Modi | (Photo credit: archived, edited, representative image)

लठ्ठपणा (Obesity Awareness) आणि जीवनशैलीच्या विकारांचा सामना करण्यासाठी देशव्यापी प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारतीय कुटुंबांनी त्यांच्या स्वयंपाकाच्या तेल (Cooking Oil Reduction) सेवन 10% कमी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM ) यांनी केले आहे. डेहराडून येथे 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांच्या फिट इंडिया (Fit India) भाषणादरम्यान केलेल्या या आवाहनाला बॉलिवूड सेलिब्रिटी, खेळाडू आणि आरोग्य तज्ञांचा व्यापक पाठिंबा मिळाला आहे. पाठिमागील काही वर्षांमध्ये भारतामध्ये लठ्ठपणा आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या शारीरिक समस्या आणि आजारांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे अवाहन महत्त्वाचे मानले जात आहे.

खाद्यतेलाचा वापर करमी करा

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांनी आपल्या आहारात लहान परंतु प्रभावी बदल करण्याच्या गरजेवर भर दिला. 'आमच्या घरात महिन्याच्या सुरुवातीला रेशन येते. त्यात तेलाचाही समावेश असतो. जर आपण खाद्यतेल दोन लिटर खरेदी केल्यास, त्याचा स्वयंपाकघरातील तेलाचा वापर कमीतकमी 10% कमी करा. आपल्या दैनंदिन आहारात तेलाचा वापर कमी केल्याने आरोग्याच्या समस्या टाळण्यास मदत होऊ शकते, असे ते म्हणाले.

खाण्यापिण्याच्या सवयी बदला, आरोग्य सुधारा, आयुष्य वाढवा

देशात लठ्ठपणा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तरुणांसह सर्व वयोगटातील लोकांना धोका आहे यावर भर देत पंतप्रधानांनी भारतातील लठ्ठपणाची वाढती चिंता अधोरेखित केली. लठ्ठपणा हा मधुमेह आणि हृदयरोगांना कारणीभूत ठरणारा एक प्रमुख घटक आहे असे नमूद करून त्यांनी राष्ट्राला त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले. 'आपल्या देशात लठ्ठपणा झपाट्याने वाढत आहे. तरुणांसह प्रत्येक वयोगटाला याचा फटका बसत आहे. ही चिंतेची बाब आहे कारण यामुळे मधुमेह आणि हृदयाच्या आजारांसारख्या आजारांचा धोका वाढतो', असा इशारा त्यांनी दिला. याच वेळी त्यांनी खाण्यापिण्याच्या सवयी बदला, आरोग्य सुधारा, आयुष्य वाढवा, असा संदेशही दिला. (हेही वाचा, Edible Oil Adulteration: खाद्यतेलातील भेसळ कशी ओळखावी? FSSAI सांगीतली घरगुती युक्ती)

दैनंदिन व्यायाम आणि तंदुरुस्तीला प्रोत्साहन

आहारातील बदलांव्यतिरिक्त, पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना त्यांच्या दिनचर्येत नियमित शारीरिक हालचालींचा समावेश करण्यास प्रोत्साहित केले. 'आज, मी सर्वांना दररोज व्यायामासाठी वेळ काढण्याचे आवाहन करू इच्छितो. मग ते चालणे असो किंवा व्यायाम, तंदुरुस्त राहण्यासाठी काही प्रकारच्या शारीरिक हालचालींमध्ये सहभागी व्हा', ते पुढे म्हणाले. (हेही वाचा, Obesity and Cancer: कर्करोगाची जवळजवळ 40% प्रकरणे लठ्ठपणाशी निगडीत; अभ्यासात धक्कादायक खुलासा)

का वाढतो आहे लठ्ठपणा?

पंतप्रधान मोदींनी लठ्ठपणाविरुद्ध कार्यवाही करण्याच्या आवाहनावर, एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक डॉ. (प्रा.) प्रशांत पी. ​​जोशी म्हणतात, 'भारत लठ्ठपणाच्या वाढत्या साथीचा सामना करत आहे. जीवनशैलीतील बदलांमुळे प्रामुख्याने बैठी जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव, चरबी आणि कॅलरीजने समृद्ध आहाराचे सेवन, फळे आणि भाज्यांचा समावेश असलेल्या पारंपारिक आहाराचा कमी वापर आणि गोड पेये यांचे सेवन, जंक फूडचे सेवन मोठ्या प्रमाणावर होत आहे आहे. लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह होतो, त्यामुळे उच्च कोलेस्ट्रॉल होतो ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि अर्धांगवायूचा झटका येतो. निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून लठ्ठपणा टाळा.' (हेही वाचा: Mud Utensils Best For Cooking: चिखलाची भांडी स्वयंपाकासाठी सर्वोत्तम! नॉन-स्टिक भांड्यात स्वयंपाक करणं आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; भारताच्या सर्वोच्च पोषण संस्थेने दिला इशारा)

नागपूर एम्स कार्यकारी संचालकांक काय म्हणाले?

बॉलीवूड आणि क्रीडा आयकॉन्सकडून उपक्रमास पाठिंबा

विविध क्षेत्रातील अनेक प्रमुख व्यक्तींनी पंतप्रधान मोदींच्या उपक्रमाचे स्वागत केले आहे. तंदुरुस्तीबाबत अधिक सजग असलेला अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर आपली सहमती व्यक्त केली. 'किती खरंय! हे मी वर्षानुवर्षे सांगत आलो आहे. पंतप्रधानांनी स्वतः ते इतके योग्यरित्या मांडले आहे, ते मला प्रचंड आवडले. आरोग्य ही संपत्ती आहे. लठ्ठपणाशी लढा देणे हे सर्वोत्तम शस्त्र आहे', असेही अभिनेता म्हणाला.

अभिनेता अक्षय कुमार यांच्याकडून मोहिमेचे स्वागत

बॉक्सिंग चॅम्पियन विजेंदर सिंगनेही या मोहिमेला पाठिंबा दर्शवत सांगितले की, संतुलित आहार आणि व्यायामाबद्दल जागरूकता वाढवणे कौतुकास्पद आहे. 'या उपक्रमाचा अनेकांना, विशेषतः मधुमेह किंवा लठ्ठपणाशी झुंज देणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. जीवनशैलीतील छोट्या बदलांचा आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. आम्ही पंतप्रधान मोदींच्या मोहिमेचे स्वागत करतो', असे ते म्हणाले.

जागतिक आरोग्य संघटनांचा मोदींचा संदेश

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) दक्षिण-पूर्व आशिया विभागाने लठ्ठपणाशी संबंधित आरोग्याच्या जोखमींचा सामना करण्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायामाच्या महत्त्वावर भर देत पंतप्रधान मोदींच्या मोहिमेची दखल घेतली. 'पंतप्रधान @narendramodi यांनी वाढत्या #obesity आणि #diabetes आणि हृदयरोगासारख्या असंसर्गजन्य आजारांना तोंड देण्यासाठी नियमित शारीरिक हालचाली आणि पौष्टिक आहाराचे आवाहन केले आहे.

डब्ल्यूएचओकडूनही पंतप्रधानांच्या अवाहनाचे स्वागत

पी. डी. हिंदुजा रुग्णालयाचे सीईओ गौतम खन्ना यांनी या उपक्रमाचे, वेळेवर कृती करण्याचे आवाहन म्हणून कौतुक केले. 'आरोग्य ही आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. रोगांपासून बचाव करणे आणि आरोग्य सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे. लठ्ठपणा आणि संबंधित जोखीम कमी करण्याबाबत पंतप्रधान मोदींचा संदेश आजच्या भारतासाठी महत्त्वपूर्ण आहे', असे ते म्हणाले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now