ICMR on Protein Supplements: प्रोटीन सप्लीमेंट्स घेता? सावधान! आयसीएमआरचा इशारा; सावधगिरी बाळगण्याचे आवाहन, संतुलित आहाराची शिफारस

शरीरातील स्नायू बळकट (Body Muscles) करण्यासाठी आणि ते वाढविण्यासाठी अतिरिक्त स्वरुपात घेतल्या जाणारे प्रोटिन सप्लिमेंट्स (Protein Supplements) टाळून संतुलीत आहारास (Balanced Diet) प्राधान्य द्यावे असेही आयसीएमआरने म्हटले आहे.

ICMR on Protein Supplements | | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

ICMR Advisory for Balanced Diet: निरोगी आहाराच्या सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि गैर-संसर्गजन्य रोग (NCDs) च्या वाढीचा सामना करण्यासाठी, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) सुधारित आहार मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. शरीरातील स्नायू बळकट (Body Muscles) करण्यासाठी आणि ते वाढविण्यासाठी अतिरिक्त स्वरुपात घेतल्या जाणारे प्रोटिन सप्लिमेंट्स (Protein Supplements) टाळून संतुलीत आहारास (Balanced Diet) प्राधान्य द्यावे असेही आयसीएमआरने म्हटले आहे. खास करुन आहारामध्ये मिठाचे प्रमाण कमी ठेवावे, साखरेचा कमीत कमी वापर आणि अति-प्रक्रिया केलेले पदार्थ कमी करण्याचा सल्ला ही संस्था देते. योग्य आहाराच्या माध्यमातूनच शरीरास प्रथिने द्यावीत, असे सांगतानाच अन्न निवडण्यासाठी फूड लेबलवरील माहिती वाचण्याची शिफारस ही संस्था करते.

भारतीयांसाठी आहार मार्गदर्शक तत्त्वे

हैदराबादस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN), ICMR च्या संरक्षणाखाली कार्यरत असून, बुधवारी अद्ययावत 'डायटरी गाइडलाइन्स फॉर इंडियन्स (DGIs)' चे अनावरण केले. ICMR-NIN च्या संचालक डॉ. हेमलता आर यांच्या नेतृत्वाखालील तज्ञांच्या पॅनेलने तयार केलेल्या, या मार्गदर्शक तत्त्वांची वैज्ञानिक छाननी करण्यात आली. त्यानुसार पोषक तत्वांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि असंसर्गजन्य रोग (NCDs) टाळण्यासाठी सुधारित 'भारतीयांसाठी आहार मार्गदर्शक तत्त्वे' (DGIs) जारी केली. ज्यामध्ये सतरा प्रमुख शिफारशींचा समावेश आहे. (हेही वाचा, Importance of Metabolism: आरोग्यदायी जीवनशैली आणि चयापचय यांचे महत्त्व काय?)

प्रोटीन्स पावडरचे दीर्घकाळ सेवन आरोग्यास हानीकारक

DGI मध्ये, NIN ने म्हटले आहे की, अधिक प्रमाणात प्रथिने पावडरचे (प्रोटीन्स सप्लिमेंट्स) दीर्घकाळ सेवन करणे किंवा उच्च प्रथिने सातत्याने घेत राहिल्याने हाडांचे खनिज नुकसान आणि मूत्रपिंडाचे नुकसान होण्यासारखे संभाव्य धोके निर्माण होतात. शिवाय इतरही शारीरिक व्याधींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आहारामध्ये एकूण उर्जेच्या वापराच्या तुलनेत साखरेचे सेवन 5% पेक्षा कमी किंवा मर्यादित ठेऊन संतुलित आहार घेण्यासाची सूचना मार्गदर्शक तत्वांमध्ये करण्यात आली आहे.  (हेही वाचा, How To Increase Metabolism: चयापचय कसे सुधारावे? इथे आहेत काही महत्त्वाच्या टीप्स)

संतुलित आहाराचे सूत्र

दरम्यान, DGI ने भर देत म्हटले आहे की, कडधान्ये आणि बाजरी यांचा एकूण कॅलरीजपैकी 45 टक्के वाटा असावा, तर कडधान्ये, बीन्स आणि मांस 15 टक्क्यांपर्यंत पुरवले पाहिजेत. उरलेल्या कॅलरी काजू, भाज्या, फळे आणि दूध यांमधून मिळाव्यात. शिवाय, एकूण चरबीचे सेवन 30 टक्क्यांपेक्षा कमी किंवा बरोबरीचे असावे, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.

DGI भर देऊन सांगते की, भारतातील बहुतांश नागरिकांचे आरोग्य बिघडण्याची तक्रार आणि त्यांना होणारे आजार हे संतुलीत आहार नसल्याने होतात. आहारातअत्यावश्यक पोषक घटकांचे कमी सेवन केल्याने चयापचय क्रिया विस्कळीत होऊ शकते आणि लहान वयातच इन्सुलिन प्रतिरोधक आणि संबंधित विकारांचा धोका वाढू शकतो. एका अंदाजानुसार भारतातील एकूण आजारांपैकी 56.4 टक्के आजार हे चुकीच्या आहारामुळे होते. निरोगी आहार आणि शारीरिक हालचालींमुळे कोरोनरी हृदयरोग (CHD) आणि उच्च रक्तदाब (HTN) चे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी होऊ शकते आणि 80 टक्क्यांपर्यंत टाईप 2 मधुमेह टाळता येतो. त्यासाठी योग्य जीवनशैल आसणे आवश्यक आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif