ICMR कडून Dry Swab RT-PCR COVID-19 Test ला परवानगी; आता कोविड टेस्टिंग होणार वेगवान

Rakesh K Mishra यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही नवी टेस्ट सोपी, स्वस्त आणि वेगवान आहे. आरोग्य कर्मचार्‍यांसाठीही सुरक्षित आहे.

Covid 19 Test | Representational Image | (Photo Credits: PTI)

ICMR कडून CSIR institute च्या ड्राय स्वॅब आरटीपीआर टेस्टला परवानगी देण्यात आली आहे. ही टेस्ट Centre for Cellular & Molecular Biology (CCMB) कडून विकसित करण्यात आली आहे. नॉर्मल आरटीपीसीआर च्या तुलनेत ही ड्राय आरटीपीसीआर टेस्ट 30-40% स्वस्त आहे. तसेच ही रिपोर्ट देखील लवकर देत असल्याने आता ही अधिक फायदेशीर ठरणार असल्याचं चित्र आहे. एप्रिल 2020 पासून तिच्या वापराला सुरूवात करून संबंधित कर्मचार्‍यांना ती कशी वापरायची याचं प्रशिक्षण देण्याचं काम सुरू आहे.

ड्राय स्वॅब आरटीपीसीआर टेस्ट ही नॉर्मल आरटीपीसीआर मधील एक व्हेरिएशन असणार आहे. ही RNA-extraction-free testing method आहे. असेदेखील सांगण्यात आले आहे. (Feluda Paper Strip Test: कोविड19 च्या निदानासाठी अचूक, झटपट निकाल देणार्‍या नव्या चाचणीसाठी ICMR ची नियमावली जारी; जाणून या टेस्टची वैशिष्ट्यं).

RT-PCR आणि DArRT-PCR मधील फरक काय आहे?

ड्राय स्वॅब आरटीपीसीआर मध्ये नेसल स्वॅब म्हणजेच नाकातील घेतलेला नमूना गोळा कडून सुक्या अवस्थेमध्ये जमा करेल. सध्याच्या आरटीपीसीआर मध्ये त्यासाठी वायरल ट्रान्स्पोर्ट मिडीयम वापरलं जातं. नव्या पद्धतीमध्ये आता VTM आणि RNA isolation या दोन पायर्‍या वगळल्या जातील. RT-PCR, Antigen, Antibody Test: कोविड 19 चं निदान करण्यासाठी केल्या जाणार्‍या विविध COVID Tests टेस्ट मधील नेमका फरक काय ते कोणती चाचणी कधी करावी?

ड्राय स्वॅब टेस्टचे फायदे काय आहेत?

CSIR-CCMB चे डिरेक्टर Dr. Rakesh K Mishra यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही नवी टेस्ट सोपी, स्वस्त आणि वेगवान आहे. आरोग्य कर्मचार्‍यांसाठीही सुरक्षित आहे. Apollo Hospitals आणि Meril Life Pvt Ltd कडून त्याचे कीट्स मिळणं अपेक्षित आहे. अंदाजे 50 हजार टेस्ट या नव्या ड्राय स्वॅब आरटीपीसीआर ने करून झाल्या आहेत.