COVID-19 च्या काळात स्वत:चे आरोग्य जपण्यासाठी करा '3' गोष्टी; महाराष्ट्र शासनाने दिली माहिती
याची माहिती MahaDGIPR माध्यमातून देण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कोरोनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. अशा स्थितीत लोकांनी सोशल डिस्टंसिंगचा(Social Distancing) नियम पाळून कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात येत आहे. यासोबत स्वत:ची काळजी घ्या, स्वत:ला जपा असेही शासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. या भीषण विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी ही शासकीय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. मात्र यातही नागरिकांनी घरात राहून स्वत:चे आरोग्य जपण्यासाठी शासनाकडून 3 महत्वाच्या गोष्टी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
शारीरिक नैसर्गिक रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी 3 मह्त्वाचे आणि सोपे उपाय महाराष्ट्र शासनाकडून सांगण्यात आले आहेत. याची माहिती MahaDGIPR माध्यमातून देण्यात आली आहे.
हेदेखील वाचा- जंतू नष्ट होण्यासाठी हात किती वेळ धुवावेत? हात धुण्यासाठी नेमका कशाचा वापर करावा? जाणून घ्या हात धुण्याची योग्य पद्धत
1. दररोज गरम पाण्याचे सेवन करा
2. दररोज कमीत कमी 30 मिनिटे योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा करा.
3. आपल्या रोजच्या आहारात कोथिंबीर, लसूण, जिरे आणि हळद यांचा समावेश करा.
कोविड-19 च्या प्रार्दुभावच्या काळात आपले आरोग्य जपण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे आयुर्वेदिक उपाय महाराष्ट्र शासनाने सांगितले आहे.
महाराष्ट्रात मुंबई, पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मुंबईतील धारावी, वरळी, दादर आदी ठिकाणं हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत.