जाणून घ्या घरी आयसोलेशनमध्ये असलेल्या Covid-19 च्या रुग्णांनी नक्की कशी काळजी घ्यावी; सरकारने जारी केले Dos and Don’ts

देशभरातील 14 कोरोना दक्षता केंद्राच्या तज्ञांनी अलीकडेच ‘कोविड-19 गृह विलगीकरण व्यवस्थापन’ या विषयावर एम्सच्या वतीने प्रशिक्षण सत्र घेतले

Coronavirus outbreak in India (Photo Credits: IANS)

कोविड-19 (Coronavirus) ची सौम्य बाधा झालेली असेल तर प्रारंभीच लक्षणे दिसून आल्यानंतर, घरामध्येच उपचार केल्यानंतर बहुतेक लोक लवकर पूर्ण बरे होतात हे आता स्पष्ट झालेले आहे. अशा रुग्णांनी स्वत:चे संरक्षण करण्यासाठी आणि संसर्गाचा प्रसार टाळण्यासाठी, स्वत:ला घरातल्या इतर सदस्यांपासून वेगळे राहण्याची आवश्यकता आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि वैद्यकीय ज्ञान यावर आधारित, सरकारने गृह विलगीकरणासाठी मार्गदर्शक नियम जारी केले आहेत. देशभरातील 14 कोरोना दक्षता केंद्राच्या तज्ञांनी अलीकडेच ‘कोविड-19 गृह विलगीकरण व्यवस्थापन’ या विषयावर एम्सच्या वतीने प्रशिक्षण सत्र घेतले.

या चर्चेमध्ये ठळक मांडलेले मुद्दे आणि काय करावे तसेच करू नये, याची माहिती खालीलप्रमाणे आहे. या मार्गदर्शक सूचना आरोग्य व्यावसायिक आणि रूग्णांची काळजी घेणाऱ्यांसाठी तसेच आणि जे लोक संक्रमित होऊन घरामध्ये अयासोलेशनमध्ये आहेत, त्यांना उपयुक्त आहे.