स्वयंपाकासाठी वापरला जाणारा मसाला भेसळयुक्त आहे की नाही 'या' पद्धतीने तपासून पहा
त्यामुळे आपल्याला काही पदार्थ खरेदी करताना त्यात भेसळ केली असली तरीही कळून येत नाही.
बाजारात विकल्या जाणाऱ्या स्वयंपाक घरातील पदार्थात काही वेळेस भेसळ केली असल्याचे दिसून येते. त्यामुळे आपल्याला काही पदार्थ खरेदी करताना त्यात भेसळ केली असली तरीही कळून येत नाही. प्रत्येक शहरात बहुतांश करुन घरगुतील महिला स्वयंपाकासाठी वापरला जाणारा मसाला बाजारातून खरेदी करतात. मात्र मसाले पदार्थांच्या विक्रीमध्ये अधिक नफा मिळत असल्याने काही दुकानदारांकडून भेसळ केली जाते.
फुड अॅन्ड सप्लाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी असे सांगितले आहे की, उघड्यावर विकल्या जाणाऱ्या मसाल्यांची कधीच खरेदी करु नये. कारण उघड्यावर विकले जाणारे मसाले त्यांमध्ये धुळीचे कण मिसळले जातात. असे मसाले तुम्ही जर जेवणात वापरल्यास आरोग्यासंबंधित त्रास उद्भवण्याची शक्यता फार असते. उघड्यावरील मसाल्यांना वास येतो पण गडद रंग असलेल्या मसाल्यांमध्ये काही वेळेस भेसळ केलेली असते. तर स्वयंपाकासाठी वापरला जाणारा मसाला भेसळयुक्त आहे की नाही 'या' पद्धतीने तपासून पहा.(थंडीच्या दिवसात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्या 'हे' आरोग्यदायी सूप)
हळद पावडरचा रंग आधीपासूनच गडद असतो. मात्र काही वेळेस त्यात रंगाची भेसळ सुद्धा करण्यात येते. शुद्ध हळदीचा रंग हा पिवळा असल्याचे सहज दिसून येतो. तज्ञांच्या मते रंग हा केमिकल पासून बनवला जातो आणि तोच हळदीच्या पावडरमध्ये मिसळला जातो. तुम्हाला भेसळयुक्त हळद तपासून पहायची असल्यास थोडीशी हळद पाण्यात टाकल्यास त्याचा रंग निघून गेल्याचे दिसून येईल.
-धणे पूड
धणे पूड मध्ये तण मिसळलेले असतात. त्यामुळे शुद्ध धणे पूड ओळखणे थोडे कठीण होते. धणे पूड मधून वास न आल्यास समजून जा की त्यामध्ये भेसळ केली आहे.
-मीठ
कॉमन सॉल्ट आणि आयोडाइज सॉल्ट यामध्ये फरक कसा ओळखाल? त्यासाठी एक बटाटा घेऊन त्याचे दोन भाग करा. या दोन्ही भागावर अनु्क्रमे कॉमन सॉल्ट आणि आयोडाइज सॉल्ट लावल्यानंतर काही लिंबूचे थेंब टाका. तर 10 मिनिटांनी ज्या बट्याटाचा रंग निळा होईल ते आयोडाइज सॉल्ट आहे. जर निळा रंग दिसून न आल्यास ते कॉमन सॉल्ट असल्याचे कळून येईल.
-केसर
शुद्ध केसरचा रंग अधिक गडद असून ते सहज तुटत नाही. पण भेसळयुक्त केसर अगदी सहज तुटले जाते. एवढेच नाही त्याचा रंग पिवळा आणि लाल दिसून येईल. शुद्ध केसर ओळखण्यासाठी ते पाण्यात टाका. जर केसरचा रंग निघून गेला तर ते शुद्ध असल्याचे कळून येईल.
-लवंग
लवंगाचे नैसर्गिक तेल बाजारात उपलब्ध असते. भेसळयुक्त लवंग तपासून पाहण्यासाठी ती पाण्यात टाका. त्यानंतर ती पाण्यावर तरंगल्यास ती शुद्ध नसल्याचे कळेल.
तज्ञांच्या मते बाजारात उपलब्ध असलेला अख्खा मसाला खरेदी करुन त्याची पावडर घरच्या घरी बनवून तो तुम्ही जेवणासाठी वापरावा. त्याचसोबत लोकल कंपनीच्या मसाल्यांचा वापर सुद्धा अधिक जपून करावा.