IPL Auction 2025 Live

How To Book Booster Dose: बूस्टर डोस कसा बुक करावा? कोविड बूस्टर डोससाठी Co-WIN वर 'या' सोप्या स्टेप्सने करा नोंदणी

कारण तुम्ही Co-WIN द्वारे स्लॉट बुक करू शकता.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

How To Book Booster Dose: जगभरातील भारताच्या शेजारी चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनाव्हायरस (COVID-19) रुग्णांची संख्या वाढत आहे. कोविड-19 प्रकरणांची आणखी एक लाट रोखण्यासाठी सरकारने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या यादृच्छिक चाचणीसह प्रतिबंधात्मक उपाय जाहीर केले आहेत. वाढत्या COVID-19 च्या चिंतेमध्ये, जर तुम्ही बूस्टर डोस कसा बुक करायचा ते शोधत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी. ज्यांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे, ते COVID-19 बूस्टर शॉटसाठी पात्र आहेत. Co-WIN द्वारे COVID-19 बूस्टर डोससाठी स्लॉट कसा बुक करायचा याबद्दल स्टेप-बाय-स्टेप माहिती जाणून घेऊयात...

टाटा इन्स्टिट्यूट फॉर जेनेटिक्स अँड सोसायटी (TIGS) चे संचालत राकेश मिश्रा यांनी सांगितलं की, कोरोनाव्हायरसचे BF.7 प्रकार हा ओमिक्रॉन स्ट्रेनचे उप-प्रकार आहे. भारताने लोकसंख्येवरील नवीन प्रकारांच्या तीव्रतेबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही. (हेही वाचा -Covid New Variant BF7: चीनमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा कहर; भारतातही झाली विषाणूची एंट्री, काय आहेत BF7 विषाणूची लक्षणं)

दरम्यान, COVID-19 च्या प्रादुर्भावामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. परंतु, त्यांनी COVID-19 बूस्टर शॉट किंवा बूस्टर डोस घेतला नाही. त्यामुळे, तुम्ही अशा लोकांपैकी असाल ज्यांनी अद्याप बूस्टर शॉट घेतला नाही, तर काळजी करू नका. कारण तुम्ही Co-WIN द्वारे स्लॉट बुक करू शकता.

Co-WIN वर बूस्टर शॉटसाठी स्लॉट कसा बुक करायचा -

तारीख आणि वेळ निवडा -

पेमेंट करा आणि COVID-19 बूस्टर शॉटसाठी तुमचा स्लॉट बुक करा.

दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने देखील लोकांना तात्काळ प्रभावाने कोरोनाव्हायरस संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे सांगितले आहेत. IMA ने लोकांना सर्व सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क घालण्यास सांगितले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास टाळण्याव्यतिरिक्त सामाजिक अंतर राखण्यास सांगितले आहे. याशिवाय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने भारतात येणाऱ्या 'आंतरराष्ट्रीय आगमनांसाठी मार्गदर्शक तत्त्वे' जारी केली आहेत. (हेही वाचा - Covid-19 BF.7 Variant in India: भारतात BF.7 व्हेरियंटचे 4 रुग्ण; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बोलावली राज्याच्या आरोग्य मंत्र्याची बैठक)

मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, सर्व प्रवाशांनी त्यांच्या देशाच्या कोविड-19 नियमांनुसार पूर्णपणे लसीकरण केले पाहिजे. "प्रवासादरम्यान कोविड-19 ची लक्षणे असलेल्या प्रवाशांना मानक प्रोटोकॉलनुसार वेगळे केले जाईल," असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.