Holi 2019: केस आणि त्वचा यावरून होळीचे रंग सुरक्षितपणे काढल्यासाठी खास '9' टीप्स
होळीच्या रंगांमुळे केसांचं आणि त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता दाट असते मग पहा कमीत कमी त्रासात होळीच्या रंगापासून सुटका कशी मिळवाल
होळी (Holi) दहनानंतर दुसऱ्या दिवसापासून धुळवडीला (Dhulvad) सुरुवात होते. पुढील चार दिवस रंगाचा खेळ खेळला जातो. महाराष्ट्रासह देशभरात आणि आजकाल परदेशामध्येही धूलिवंदनाच्या (Dhulivandan) दिवशी रंगांनी होळी खेळली जाते. ठरवून होळी दिवशी रंग खेळणारे अनेक जण बाहेर पडण्यापूर्वीच त्वचे मॉइश्चरायझर, तेल लावून बाहेर पडतात. पण जर तुम्हांला कोणी बेसावध असताना रंगात रंगवलं तर त्याचा त्रास होऊ शकतो. रासायनिक, भेसळयुक्त रंगांमुळे त्वचेचं, केसांचे नुकसान होते. त्यामुळे सुरक्षित रित्या केसांमधून आणि त्वचेवरून रंग काढायचा असेल तर या काही टिप्स नक्की लक्षात ठेवा. Holi First Aid Tips: होळी खेळताना रंग तोंडात, डोळ्यात गेल्यानंतर जीवावर बेतण्याआधीच काय कराल?
सुरक्षितपणे होळीचा रंग कसा काढाल?
केसांचं सौंदर्य राखण्यासाठी टीप्स
- केसांमधून किंवा त्वचेवरून काढायचा असेल तर गरम पाण्याऐवजी साध्या तापमानाच्या पाण्याचा वापर करा. गरम पाण्यामुळे रंग अधिक चिकटून राहू शकतो.
- केसांवर शाम्पू लावण्याआधी ते पाण्याने भिजवून शक्य तितका रंग पाण्यानेच निघून जाईल याची खात्री करा. त्यानंतर केसांवर शाम्पू लावा.
- हेअर पॅक्सचा वापर करा. किंवा घरच्या घरी काही हेअर पॅक्स बनवा. यामध्ये भिजवलेले मेथीचे दाणे आणि दह्याचा हेअर पॅक किंवा अंड्याचा केवळ पिवळा भाग केसांना लावून अर्धा तासानंतर केस सौम्य शॅम्पूने धुवा.
- केसांचं फारच नुकसान झालं असेल तर डीप कंडीशनींग साठी मध आणि ऑलिव्ह ऑईल केसांना लावून आंघोळ करा.
त्वचेचं सौंदर्य राखण्यासाठी टीप्स
- रंग काढण्यासाठी चेहरा सतत धुणं टाळा अनेकदा यामुळे रंग अधिक खोल जाण्याची शक्यता असते.
- त्वचेवरून रंग काढताना उत्तम स्क्रबर वापरा. साबणाने रंग काढण्याऐवजी चेहऱ्यावर माईल्ड क्लींजर लावा त्याने रंग काढण्याचा प्रयत्न करा.
- त्वचेवर जळजळ होत असल्यास मुलतानी माती आणि गुलाबपाण्याचा फेसपॅक लावा.
- चारकोल पील ऑफ किंवा तुमच्या त्वचेच्या पोतानुसार आवश्यक फेसपॅकचा वापर करा.
- शरीरावरुन रंग काढताना त्वचेला त्रास होईल इतक्या जोरात घासू नका.
होळीच्या रंगात खेळल्यानंतर लगेजच कोणत्याही केमिकल ट्रीटमेंटस, ब्लिचिंग, वॅक्सिंग करणं टाळा. यामुळे त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता असते. किमान आठवडाभराच्या आरामानंतर पार्लरमध्ये ट्रीटमेंट घ्या.