सावधान! आल्याचा चहा पिण्याचे ‘हे’ 5 तोटे तुम्हाला माहित आहेत का ?

तुम्हीही आल्याचा चहा पित असाल तर खालील साईड इफेक्ट नक्की जाणून घ्या.

आल्याचा चहा (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

थंडीच्या दिवसात सर्वांनाच चहा हवाहवासा वाटतो. त्यात आल्याचा चहा म्हटलं की, आणखीचं बरं वाटतं. आल्याचा चहा पिण्याचे अनेक फायदे आहत. आल्याचा चहा सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतो. आल्याचा समावेश गरम पदार्थांमध्ये होतो. त्यामुळे आल्याच्या सेवनाने शरीराला उष्णता मिळते, त्याचप्रमाणे आळसही दूर होतो. आल्याचे अनेक औषधी फायदे आहेत. व्हिटॅमिन ए, सी, ई आणि बी-कॉम्प्लेक्सचा एक उत्तम स्त्रोत म्हणून आलं ओळखलं जातं. त्याचबरोबर यात मॅग्नेशिअम, फॉस्फरस, आर्यन, झिंक, कॅल्शिअम आणि बीटा कॅरेटीन मुबलक प्रमाणात असतात. परंतु, असं असलं तरी प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे असतात. तुम्हाला माहित आहे का आल्याचा चहा पिणे आपल्या शरीराला घातक ठरू शकते. तुम्हीही आल्याचा चहा पित असाल तर खालील साईड इफेक्ट नक्की जाणून घ्या.

अनेकदा काही लोक दिवसभरात २ ते ३ वेळा आल्याचा चहा पितात. परंतु, आल्याचं जास्त प्रमाणात सेवन करणं आपल्या आरोग्यासाठी धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे आल्याचे योग्य प्रमाणात सेवन करणं गरजेचं आहे.

आल्याचा चहा पिण्याचे तोटे –

  1. दिवसभरात जास्त प्रमाणात आल्याचा चहा पिल्याने अस्वस्थता आणि झोप न येण्याची समस्या उद्भवू शकते. झोपण्याअगोदर आल्याचा चहा पिल्याने छातीत जळजळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे झोपण्यापूर्वी आल्याचा चहा पिणे टाळावे.
  2. आल्याच्या चहाचं अधिक सेवन केल्याने पोटात अ‍ॅसिडची होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमची पचनक्रिया खराब होऊ शकते. आल्याचा चहा वारंवार पिल्याने जळजळ, डायरिया आणि मळमळ होण्याची समस्या होऊ शकते.
  3. आल्याचं सेवन केल्याने लोकांमध्ये हीमोफिलिया सारखा रक्ताचा आजार होऊ शकतो. त्यामुळे आल्याचा चहा घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्ही रक्त पातळ करणारं कोणतही औषध घेत असाल तर आल्याच्या चहाचं सेवन करू नका. कारण, आल्याच्या चहामध्ये आयब्रूफेन आणि अ‍ॅस्प्रिन सारखी औषधे असतात. त्यामुळे रक्ताची आल्यातील घटकांसोबत क्रिया घडण्याची शक्यता असते.
  4. कोणत्याही शस्त्रक्रियेआधी आल्याचा चहा पिणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. शस्त्रक्रियेआधी देण्यात येणाऱ्या भूलीच्या औषधाबरोबर आल्याची रिअ‍ॅक्शन होत असते. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर किंवा आधी आल्याचा चहा पिणे टाळा.
  5. सकाळी अनोशापोटी आल्याचा चहा पिल्याने पोट बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी आल्याचा चहा घेणं टाळा.

आल्याचा चहा पिल्याने अनेकांना फ्रेश जाणवतं. परंतु, दिवसभरात आल्याचे जास्त प्रमाणात सेवन करणं आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे दिवसभरात एखादा कप आल्याचा चहा घेतल्याने तुम्हाला इजा पोहचण्याचा धोका नाही. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने आल्याच्या चहाचे सेवन करू शकता.(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. आल्याचा चहा घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)