WHO कडून पहिल्या mpox diagnostic test ला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी

Mpox, ज्याला एकेकाळी मंकीपॉक्स म्हटले जात होते हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे. यामध्ये ताप, डोकेदुखी, सुजलेल्या लिम्फ नोड्स आणि 2 ते 3 आठवडे टिकणारे पुरळ ही लक्षणं दिसतात.

WHO (फोटो सौजन्य - X/ @ReutersWorld)

जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization)कडून पहिल्या Mpox Diagnostic Test साठी मंजुरी देण्यात आली आहे. गुरूवार (3 ऑक्टोबर) दिवशी Abbott Laboratories’ PCR diagnostic test ला मंजुरी देण्यात आली आहे. त्याला Alinity MPXV assay देखील म्हटलं जात. याच्या माध्यमातून त्वचेच्या स्वॅब मधून Mpox Virus DNA चं निदान करता येणार आहे.

WHO कडून अजून 3 अन्य mpox diagnostic tests ची चाचपणी सुरू आहे. Roche आणि Labcorp यासरख्या कंपन्यांना टेस्टिंग सुधारण्यासाठी काम सुरू आहे. Emergency Use Listing (EUL) प्रक्रिया WHO ला public health emergencies च्या काळात विनापरवाना लसी, उपचार आणि निदान चाचण्यांच्या मंजुरीला गती देते. ऑगस्टमध्ये, WHO ने उत्पादकांना त्यांची उत्पादने emergency review साठी सबमिट करण्यास सांगतात, विशेषत: कमी उत्पन्न असलेल्या देशांना प्रभावी निदान करण्यात मदत करण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. नक्की वाचा: Monkeypox Virus: भारतात आढळला मंकीपॉक्स क्लेड 1बी चा नवीन रुग्ण; केंद्र सरकारकडून राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना सूचना जारी .

जानेवारी 2022 पासून, 121 देशांमध्ये mpox केसेस नोंदवली गेली आहेत, 103,048 confirmed cases आणि सप्टेंबर 2024 पर्यंत 229 मृत्यू नोंदवले आहेत. प्रादुर्भावाच्या केंद्रस्थानी असलेल्या The Democratic Republic of Congo (DRC) ला पहिले mpox vaccine donations मिळाले आहे.

mpox चा नवा व्हेरिएंट clade Ib, हा पूर्वीच्या स्ट्रेन पेक्षा अधिक वेगाने पसरत आहे. हा व्हेरिएंट sexual activity मधूनही पसरत आहे. आफ्रिकेमध्ये या व्हेरिएंट चे अधिक रूग्ण महिला आणि लहान मुलं का आहेत? याचा शोध सुरू आहे.

अनेक रूग्ण यावर मात करत असले तरीही हा रोग लहान मुलांसाठी आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्यांसाठी गंभीर असू शकतो.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now