ColdZyme माऊथ स्प्रे च्या मदतीने 20 मिनिटांत 98% COVID-19 चे वायरस निष्क्रिय होतात: Enzymatica स्वीडीश कंपनीचा दावा
स्वीडीश कंपनी Enzymatica ने दावा केला आहे की ColdZyme माऊथ स्प्रे च्या मदतीने 20 मिनिटांत 98% COVID-19 आजाराला कारणीभूत असणारे SARS-CoV-2 वायरस निष्क्रिय होऊ शकतात.
जगभरात सुरू असलेलं कोरोना व्हायराचं थैमान रोखण्यासाठी संशोधक, डॉक्टर प्रयत्नांची शर्थ लावत आहे. अशामध्ये आता स्वीडीश कंपनी Enzymatica ने दावा केला आहे की ColdZyme माऊथ स्प्रे च्या मदतीने 20 मिनिटांत 98% COVID-19 आजाराला कारणीभूत असणारे SARS-CoV-2 वायरस निष्क्रिय होऊ शकतात. आज त्यांच्याकडून या माऊथ स्प्रेचे अभ्यासातून समोर आलेले प्राथमिक अंदाज प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Enzymatica ने दिलेल्या माहितीनुसार, ColdZyme हा स्प्रे ओरल कॅव्हिटीमध्ये SARS-CoV-2 सारख्या घातक व्हायरसला निष्क्रीय करण्यात प्रभावी आहे. ColdZyme मध्ये glycerol आणि Atlantic cod trypsin असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
दरम्यान अमेरिकन कंपनी Microbac Laboratories Inc कडून माऊथ स्प्रेचा अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये हा स्प्रे कोविड 19च्या व्हायरसला निष्क्रिय करण्यामध्ये कितपत प्रभावी आहे याची माहिती घेण्यात आली. कोविडच्या व्हायरस विरूद्ध माऊथ स्प्रेची कार्यक्षमता तपासण्यासाठी virucidal efficacy suspension test घेण्यात आली होती. तर यामध्ये हा माऊथ स्प्रे तोंडात ओरल कॅव्हिटीमध्ये सामान्य सर्दीच्या व्हायरस विरोधी कवच बनवण्यास सक्षम असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान अवघ्या 20 मिनिटांत 98.3% व्हायरस निष्क्रिय करण्याची त्यामध्ये क्षमता आहे. हा अभ्यास स्टॅडर्ड आणि गुणवत्तापूर्ण मेथडॉलॉजीवर करण्यात आल्याची माहिती देखील स्वीडीश कंपनीने दिली आहे.
SARS-CoV-2 चा शरीरात प्रवेश झाल्यानंतर घशाजवळ तो आपलं जाळं निर्माण करतो. अशा परिस्थितीमध्ये ColdZyme तोंडात आणि घशात स्प्रे केल्यास इंफेक्शनचा धोका कमी होईल. व्हायरल लोड कमी होईल. दरम्यान जितका व्हायरल लोड कमी तितकं त्याचं जाळं निर्माण करण्याची क्षमता कमी परिणामी SARS-CoV-2चा धोकादेखील कमी होईल असा दावा Enzymatica AB कंपनीने केला आहे. Mouth Rash COVID 19 Symptom: तोंडात रॅश हे कोविड 19 चं संभाव्य लक्षण, अधिक अभ्यासाची गरज; स्पेन संशोधकांचा दावा. नक्की वाचा
दरम्यान यापूर्वी देखिल HCoV-229E या कोरोना व्हायरस विरूद्ध ColdZyme ची चाचणी केली होती आणि ती सकारात्मक परिणामांसोबत समोर आली होती. HCoV-229Eहा व्हायरस सामान्य सर्दी होण्यास कारणीभूत आहे.
सध्या जगात कोरोनाबाधितांचा आकडा 14,669,506 च्यय पार गेला आहे. सर्वाधिक रूग्ण अमेरिकेमध्ये त्यापाठोपाठ ब्राझिल आणि भारतामध्ये दिवसागणिक झपाट्याने रूग्णसंख्या वाढत आहे.