छोट्या-छोट्या कारणांमुळे होतेय चिडचिड, जरुर 'या' गोष्टी खा!
त्यामुळे समोरचा व्यक्ती नेहमीच सामंज्यस किंवा शांत स्वभावाचा असेलच असे नाही. काही व्यक्तींना मात्र अगदी लहानसहान गोष्टींवरुन पण चटकन राग येतो.
एखाद्या व्यक्तीचा मूड कसा असेल याबद्दल तर्क लावणे हे थोडे कठीण आहे. त्यामुळे समोरचा व्यक्ती नेहमीच सामंज्यस किंवा शांत स्वभावाचा असेलच असे नाही. काही व्यक्तींना मात्र अगदी लहानसहान गोष्टींवरुन पण चटकन राग येतो. अशा व्यक्तींपासून अन्यजण जरा दूरावाच ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र रागीट व्यक्तींना कितीही राग आल्यानंतर ते शांत झाल्यावर आपल्या चुकीच्या गोष्टींमुळे एखाद्याचे मन दुखावले म्हणून नाराज होताना दिसून येतात.
त्याचसोबत काही व्यक्ती छोट्या छोट्या कारणांवरुन चिडचिड किंवा तणावाखाली जातात. परंतु अशा पद्धतीच्या व्यक्ती नेहमीच चिंतेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे जर तुमची सारखी चिडचिड होत असल्यास 'या' पदार्थांचे सेवन जरुर करा.
1) अंड
अंड्यात ओमेदा 3 फॅट अॅसिट आणि भरपूर प्रमाणात प्रोटीनसह विटामिन असते. त्यामुळे तणाव किंवा चिडचिड कमी करण्यासाठी रामबाण उपाय आहे.
2) नारळ
मीडियम चेन फॅट नावाचा पदार्थ नारळात आढळून येतो. या पदार्थामुळे व्यक्तीचे मानसिक स्वास्थ आणि मूड उत्तम राहतो.
3) केळ
पोटाशिअय आणि मॅग्नेशिअम केळ्यात भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे व्यक्तीला जाणवणारी नाराजगी काही वेळापूर्ती केळ खाल्ल्याने दूर होईल.
4) अक्रोड
ओमेगा 3 फॅट अॅसिड, प्रोटीन आणि मॅग्नेशिअम यांचे प्रमाण अक्रोडमध्ये भरपूर असते. अक्रोड खाल्ल्याने मूड उत्तम राहण्यासोबत पुरेशा प्रमाणत झोप पूर्ण करते.
5) लिंबू
लिंबूमध्ये विटामिन सी आढळते. त्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. तसेच उन्हाळ्यात लिंबूपाणी प्यायल्याने तहान भागवली जाते.
त्यामुळे वरील गोष्टी खाल्ल्यास तुमचा मूड उत्तम राहण्यास मदत होण्यासोबत छोट्या छोट्या कारणांवरुन चिडचिड होणार नाही. तसेच तुमचा मूड सारखा बदलत असेल्यास तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या.