Dry Ice म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या Gurugram Restaurant मध्ये ग्राहकांना रक्ताच्या उलट्या होण्यामागे कारणीभूत ठरलेला प्राणघातक पदार्थ!

Dry Ice | Pixabay.com

गुरूग्राम मध्ये एका कॅफेत 5 ग्राहकांना ड्राय आईस (Dry Ice)  मिश्रीत माऊथ फ्रेशनर खाल्ल्याने त्रास झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या ग्राहकांना रक्ताच्या उलट्या झाल्याने कॅफेचा मालक अटकेत आहे. दरम्यान या सार्‍या प्रकाराचा व्हिडीओ देखील सोशल मीडीयामध्ये वायरल झाला आहे. या 5 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यापैकी काही जण अस्वस्थ स्थितीत आहेत. प्राथमिक तपासामध्ये Laforestta Cafe मध्ये ग्राहकांना ड्राय आईस माऊथ रिफ्रेशर म्हणून देण्यात आल्याचं समोर आलं आहे. ग्राहकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये त्यांना माऊथ रिफ्रेशर खाल्ल्यानंतर जळजळ जाणवली असल्याचं सांगितलं आहे. मग हा ड्राय आईस नेमका काय असतो? हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल तर जाणून घ्या त्याबद्दल थोडी खास माहिती!

ड्राय आईस म्हणजे काय?

यूएस फूड अ‍ॅन्ड ड्रग्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, भारतातील FSSAI आणि Centres for Disease Control and Prevention या सार्‍यांकडून ड्राय आईस (dry ice) ला एक जीवघेणं केमिकल म्हणून संबोधण्यात आलं आहे. त्याला कधीच मोकळ्या हाताने हाताळू नका असं सांगितलं जातं. त्याला गिळलं किंवा खाल्लं तर त्वचेवर आणि आतील अवयवांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. ड्राय आईस हा घन स्वरूपातील कार्बन डाय ऑक्साईड आहे. आईसक्रिम किंवा फ्रोझन डेझर्ट्सना थंड ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. येथे यांत्रिक स्वरूपात थंडावा निर्माण केला जाऊ शकत नाही तेथे हा ड्राय आईस वापरला जातो. पण तो चूकीचा वापरला गेल्यास carbon dioxide gas मुळे dyspnea होऊ शकतो. त्यामुळे त्याचा वापर ओपन एअर किंवा हवा खेळती असलेल्या मोकळ्या भागात केला जातो. Gurugram Restaurant Shocker: माऊथ फ्रेशनर खाल्ल्यानंतर तोंडात सुरु झाली जळजळ, रक्ताच्या उलट्या; गुरुग्रामच्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील धक्कादायक घटना, गुन्हा दाखल (Watch Video) .

FSSAI कडून सध्या सर्व राज्य/UT मध्ये कमिशनर ऑफ फूड सेफ्टी यांना खाद्य उत्पादनांसाठी कूलिंग एजंट म्हणून कोरड्या बर्फाच्या सुरक्षित आणि योग्य हाताळणीबद्दल सर्व खाद्य व्यवसाय ऑपरेटर आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी एक पद्धतशीर मोहीम सुरू करावी. असं आवाहन करण्यात आलं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif