Winter Health Tips: हिवाळ्यात गुळाचा चहा प्यायल्याने होतील 'हे' फायदे

शक्यतो उन्हाळ्यात गुळाचा चहा पिऊ नये. त्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता वाढण्याची शक्तता असते. आज या लेखातून आपण हिवाळ्यात गुळाचा चहा प्यायल्याने होणारे फायदे जाणून घेऊयात...

Jaggery Tea (PC -You Tube)

Winter Health Tips: अनेकजण दररोज साखरेचा चहा पितात. साखरेचा चहा पिणं आपल्या आरोग्याला घातक ठरू शकतं. साखरेचे जास्त सेवन केल्याने भविष्यात मधूमेह होण्याची शक्यता असते. पंरतु, तुम्ही चहामध्ये साखरेऐवजी गुळ टाकला तर ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. हिवाळ्यामध्ये गुळाच्या चहा (Jaggery Tea) प्यायल्याने विविध फायदे होतात. गुळामध्ये साखरेपेक्षा जास्त न्यूट्रिएंट्स असतात. गुळ हा उष्ण पदार्थ आहे. त्यामुळे गुळाचा चहा प्यायल्याने हिवाळ्यात थंडीमुळे होणाऱ्या सर्दीपासून आपला बचाव होतो. तसेच गुळाचा चहा प्यायल्याने थंडी कमी वाजते.

गुळामध्ये साखरेपेक्षा जास्त जीवनसत्व व पोषक घटक असतात. शक्यतो उन्हाळ्यात गुळाचा चहा पिऊ नये. त्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता वाढण्याची शक्तता असते. आज या लेखातून आपण हिवाळ्यात गुळाचा चहा प्यायल्याने होणारे फायदे जाणून घेऊयात...(हेही वाचा - Winter Food Tips: थंडीत पपईचे अतिसेवन केल्यास होऊ शकतात हे '5' आजार)

हिवाळ्यात गुळाचा चहा पिण्याचे फायदे -

रक्तातील मेटाबॉल्जिम व्यवस्थित राहण्यास मदत -

गुळाचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होते. तसेच रक्तातील मेटाबॉल्जिम व्यवस्थित राहण्यास मदत होते. तसेच रक्ताशी संबंधित सर्व आजार नष्ट होण्यास मदत होते. विशेष म्हणेजे गुळ रक्तामध्ये लगेच मिसळत नाही. त्यामुळे मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.

सर्दीपासून मिळते मुक्ती -

गुळ हा उष्ण पदार्थ आहे. त्यामुळे हिवाळ्यात गुळाचा चहा पिल्याने थंडी वाजत नाही. तसेच त्यामुळे हिवाळ्यात थंडीमुळे होणाऱ्या सर्दी-पडशापासून आपला बचाव होतो. हिवाळ्यात नाक बंद झाल्यास गुळाचा चहा प्यावा. त्यामुळे तुम्हाला नक्की फायदा होतो.

Jaggery (PC - Wikimedia Commons)

संसर्गजन्य आजारांपासून मुक्ती -

गुळाचे सेवन केल्याने संसर्गजन्य आजारांपासून मुक्ती मिळते. गुळाचा चहा प्यायल्याने घसा तसेच फुप्फुसामध्ये झालेला संसर्ग दूर होतो.

थकवा कमी होण्यास मदत -

गुळामध्ये साखरेपेक्षा जास्त जीवनसत्व व पोषक घटक असतात. त्यामुळे थकवा दूर होतो. गुळाचा चहा प्यायल्याने एनर्जी वाढते.

अशा प्रकारे गुळाचा चहा प्यायल्याने वरील फायदे मिळतात. भविष्यात मधुमेहाच्या आजारापासून सुटका करायची असेल तर आतापासून गुळाच्या चहाचे सेवन करणं फायदेशीर ठरतं. तुम्हीही साखरेचा चहा पित असाल तर वेळीच सावध व्हा!