Summer Health Tips: उन्हाचा दाह कमी करण्यासाठी प्या सब्जाचे पाणी, शरीरास होतील 'हे' फायदे

शरीराचे तापमान समतोल ठेवण्यासाठी आणि शरीराला थंडावा देण्यासाठी तुम्हाला सब्जाचे पाणी (Basil Seed Water) पिणे खूप फायद्याचे ठरेल.

Basil Seed Water (Photo Credits: PixaBay)

उन्हाळा (Summer) म्हटला उकाडा, अंगावरुन घामाच्या धारा वाहणे या गोष्टी ओघाओघाने आल्याच...हा ऋतू फारसा कोणाला आवडत नाही. कारण तापमानात वाढ झाल्याने सूर्य देखील आग ओकत असतो. ज्यामुळे खूपच गरमी जाणवते. ज्याचा परिणाम शरीरावर होते. अशा वातावरणामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घेणे तसेच तुमच्या शरीरातील तापमान नियंत्रित ठेवणे याची सर्वस्वी जबाबदारी तुमची आहे. यात शरीराचे तापमान समतोल ठेवण्यासाठी आणि शरीराला थंडावा देण्यासाठी तुम्हाला सब्जाचे पाणी (Basil Seed Water) पिणे खूप फायद्याचे ठरेल.

सब्जामध्ये अल्फा-लिनोलेनिफ अॅसिड तसेच अनेक पोषक घटक असतात. ज्याचा परिणाम तुमच्या शरीरातील उष्णता कमी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे उन्हाळ्यात सब्जाचे पाणी आर्वजून प्यावे. फक्त ते पिताना ते अति प्रमाणाबाहेरही पिऊ नये. उन्हातून बाहेर आल्यानंतर त्वरित पाणे कधीही चांगले. हेदेखील वाचा- Summer Tips: उन्हाळ्यात आहार कसा असावा? 'या' गोष्टी शरीराला देतील थंडावा

जाणून घेऊयात उन्हाळ्यात सब्जाचे पाणी प्यायल्याचे फायदे

1. उन्हातून घरी आल्यानंतर सब्जाचे पाणी प्यावे यामुळे उन्हाचा दाह कमी होईल.

2. जर तुम्हाला युरिनसंबंधी काही तक्रारी असेल वा तुम्हाला उन्हाळी (सतत लघवी होणे) लागली असेल तर सब्जाचे पाणी प्यावे.

3. अंगावर पित्त उठणे, तोंड येणे, त्वचेवर उष्णतेच्या पिटीका येणे, नाकातून रक्त येत असेल तर सब्जाचे पाणी प्यावे.

4. पचनक्रिया सुधारण्यासाठी तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी सब्जा गुणकारी ठरतो.

5. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच शरीरातील टॉक्सिन दूर होतात.

थोडक्यात उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सब्जाचे पाणी प्यायलेले चांगले असते. सब्जा शक्यतो साध्या पाण्यात मिसळावा. सब्जाचे पाणी फ्रिजमध्ये ठेवून ते पाणी प्यायल्याने सर्दी होऊ शकते. सब्जा हा मुळात थंड असल्याने त्याचे पाणी पिणे शरीरास हितवर्धकच ठरेल.