Dragon Fruit Health Benefits: रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर ठरते ड्रॅगन फ्रूट; हिवाळ्यात नक्की करा सेवन

ड्रॅगन फळाच्या बियांमध्ये फायटोकेमिकल आणि अँटीऑक्सिडेंट आणि अँटीव्हायरल गुणधर्म आहेत. यामुळे हाड आणि दात मजबूत होतात.

ड्रॅगन फ्रूट (Photo Credits: Pixabay)

Dragon Fruit Health Benefits: हिवाळ्यात (Winter Season) लोकांची प्रतिकारशक्ती (Immunity) बर्‍याचदा कमकुवत होते. ज्यामुळे सर्दी, ताप यासारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे लोकांना हिवाळ्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी डॉक्टर वेगवेगळ्या फळांचे सेवन करण्यास सांगतात. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या रोग प्रतिकारशक्ती वाढवू शकतात. यापैकी एक म्हणजे ड्रॅगन फ्रूट. ज्यास पिताया असही म्हटलं जातं. हे फळ दिसायला खूप आकर्षक आहे. ड्रॅगन फळ मेक्सिको आणि मध्य आशियामध्ये आढळते. ड्रॅगन फळ आतून पांढऱ्या रंगाचे असते आणि त्यात काळ्या रंगाच्या बिया असतात.

प्रतिकारशक्ती वाढविण्याव्यतिरिक्त, या फळामुळे मधुमेह आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका देखील कमी होतो. अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट्स, फाइबर्स आणि व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले ड्रॅगन फळ अनेक गंभीर आजारांवर फायदेशीर ठरते. आज या लेखातून आपण ड्रॅगन फळाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात. (वाचा - Ghee Benefits: झोप न लागण्याच्या समस्येने त्रस्त आहात? या पद्धतीने करा तूपाचा वापर, मिळेल मोठा फायदा)

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत -

ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन सीचे सेवन केल्यास शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. त्याचे नियमित सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

पोटाच्या आजारांसाठी फायदेशीर -

पोटाच्या समस्यांसाठी ड्रॅगन फळ देखील प्रभावी मानले जाते. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, तर तुम्ही ड्रॅगन फळ खायलाचं पाहिजे. त्याशिवाय पोटाशी संबंधित इतर समस्यांवरही ड्रॅगन फळ फायदेशीर ठरते.

लोहाची कमतरता दूर करण्यास मदत -

आपल्या शरीरात लोहाची कमतरता असल्यास, आपण ड्रॅगन फळ घेणे आवश्यक आहे. यात बीटा कॅरोटीन आणि लाइकोपीन असते. ज्यामुळे लोहाची कमतरता दूर होते.

कर्करोग आणि हृदयरोगाचा धोका दूर होण्यास मदत -

ड्रॅगन फळांमध्ये कॅरोटीनोईड मुबलक प्रमाणात आढळतात. नियमित सेवन केल्यास कर्करोग आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. कर्करोग आणि हृदयाच्या आजारांसारख्या प्राणघातक रोगांचा धोका कमी करायचा असेल तर ड्रॅगन फळाचे सेवन नक्की करा.

पचनक्रिया सुधारण्यास मदत -

ड्रॅगन फळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. ड्रॅगन फळाचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. ड्रॅगन फळाच्या सेवनाने शरीरातील हेल्दी बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते आणि पाचन तंत्राला निरोगी ठेवण्यास मदत होते.

विशेष म्हणजे, ड्रॅगन फळाचा वापर डेंग्यूच्या उपचारात उपयुक्त ठरू शकतो. ड्रॅगन फळाच्या बियांमध्ये फायटोकेमिकल आणि अँटीऑक्सिडेंट आणि अँटीव्हायरल गुणधर्म आहेत. यामुळे हाड आणि दात मजबूत होतात. यामुळे दमा आणि खोकला दूर करण्यासही मदत होते.

टीप- या लेखात दिलेली सर्व माहिती केवळ सूचनात्मक उद्देशाने लिहिलेली आहे. आम्ही त्याची वास्तविकता, अचूकता आणि विशिष्ट परिणामांची हमी देत ​​नाही. वर दिलेल्या माहितीला सल्ला समजू नये. या लेखात नमूद केलेल्या टिप्स पूर्णपणे प्रभावी आहेत किंवा नाही यासंदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही. म्हणून कृपया कोणतीही टिप किंवा सूचना वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.