Ghee Benefits: झोप न लागण्याच्या समस्येने त्रस्त आहात? या पद्धतीने करा तूपाचा वापर, मिळेल मोठा फायदा
तुपामध्ये व्हिटॅमिन ए असते. जे डोळ्यांसाठी दृष्टीस उपयुक्त आहे. काचबिंदू असलेल्या रूग्णांसाठी तुप अत्यंत फायदेशीर आहे.
Ghee Benefits: अनेक लोक आहेत, जे झोपेच्या समस्येने त्रस्त आहेत. अनेकजण झोपेसाठी बरेच उपाय करतात. परंतु, तरीही या समस्येवर आराम मिळत नाही. अशा परिस्थितीत, आपण देखील या समस्येमुळे त्रस्त असाल, तर आम्ही एक उपाय घेऊन आलो आहोत. ज्यामुळे आपल्याला चांगली झोप लागेल. चला या उपायांबद्दल जाणून घेऊया.
प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात तूप सहज उपलब्ध आहे. तूप आपल्या आरोग्यासाठीचं चांगले नाही, तर पुरेशी झोप येण्यासही फायदेशीर आहे. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवाकर यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आरामदायक झोपेसाठी तूप कसे वापरावे, याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. पुरशी झोप येण्यासाठी तूपाचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊयात. (वाचा - Black Grapes Health Benefits: वजन नियंत्रणाबरोबरचं हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात काळे द्राक्ष; जाणून घ्या सविस्तर)
- प्रथम एका भांड्यात तूप काढा.
- तुपात एक बोट बुडवून ते आपल्या पायांच्या तळव्यांवर लावा.
- आता पायाच्या तळव्याची तळहाताने मालिश करा.
- दुसऱ्या तळपायाचीदेखील अशीचं मालिश करा. यामुळे आपल्याला चांगली झोप येईल.
हिवाळ्यात तूपाचे फायदे -
- हिवाळ्यामध्ये बद्धकोष्ठताची समस्या अधिक असते. झोपेच्या आधी उबदार दुधात दोन चमचे तूप टाकून प्याल तर तुम्हाला बरे वाटेल. तूप पचन प्रक्रिया व्यवस्थित ठेवण्यात उपयोगी ठरू शकते.
- हिवाळ्यामध्ये सर्दी आणि कफचा सर्वाधिक त्रास होतो. हिवाळ्यात तूप सेवन केल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो. कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब ग्रस्त लोकांसाठी तूप फायदेशीर आहे. रोज आहारात तूप घेतल्यास कोलेस्टेरॉल नियंत्रित होण्यास मदत होते.
- हिवाळ्यात त्वचा कोरडे होणे सामान्य आहे. अशा परिस्थितीत तूप फायदेशीर ठरू शकते. त्यात फॅटी अॅसिड असतात. हे त्वचेसाठी फायदेशीर ठरते.
तुपामध्ये व्हिटॅमिन ए असते. जे डोळ्यांसाठी दृष्टीस उपयुक्त आहे. काचबिंदू असलेल्या रूग्णांसाठी तुप अत्यंत फायदेशीर आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 30, 2021 04:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

