दिवाळीच्या प्रदूषणामुळे कोरडी झाली त्वचा? नो टेन्शन, 'या' सोप्या उपायांनी पुन्हा प्राप्त करा नितळ आणि मुलायम चेहरा

या गोष्टीचा परिणाम आपल्या त्वचेवरही दिसून येतो. काही वेळा तर या प्रदूषणामुळे त्वचेचे काही आजारही होतात. तर जाणून घ्या अशा प्रदुषणामध्ये त्वचेचे संरक्षण करण्यासाठी काही उपाय

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

दिवाळी (Diwali) हा एक असा सण आहे जो भारतामध्ये सर्वत्र मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. यावेळी सर्व लोक खूप मजा करतात, फटाके फोडतात, दिव्यांची रोषणाई करतात. दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करताना आपण विचारच करत नाही की फुटलेल्या फटक्यांमुळे हवेत किती प्रदूषण वाढले असेल? मात्र तसे होते, दिवाळीच्या काळात फटक्यांमुळे प्रदूषणाच्या पातळीमध्ये वाढ होते. या गोष्टीचा परिणाम आपल्या त्वचेवरही दिसून येतो. काही वेळा तर या प्रदूषणामुळे त्वचेचे काही आजारही होतात. तर जाणून घ्या अशा प्रदुषणामध्ये त्वचेचे संरक्षण करण्यासाठी काही उपाय.

> भरपूर पाणी प्या - आपल्या त्वचेसाठी पाणी किती फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे, म्हणून या काळात आपण शक्य तितके जास्त पाणी प्यावे. जास्त पाणी पिल्याने आपली त्वचा हायड्रेट होईल. हिवाळ्यात त्वचेचा ड्रायनेस कमी करण्यासाठीही जास्त प्रमाणात पाणी प्यावे.

> अँटीऑक्सिडेंटचे सेवन- कोणत्याही प्रकारच्या प्रदूषणाच्या दुष्परिणामांपासून अँटीऑक्सिडंट त्वचेचे संरक्षण करतात. टोमॅटो, गाजर, बीट, हिरव्या भाज्या इत्यादी अधिक खा. आपण ग्रीन टी किंवा आवळ्याचे सेवन करत असाल तर उत्तम.

> व्हिटॅमिन ई सह मॉइश्चरायझर - व्हिटॅमिन ईसह मॉइश्चरायझरचा वापर केल्याने त्वचेला पोषक घटक मिळतात. दिवाळीच्या वेळी फटाक्यांच्या दूषिततेमुळे आपली त्वचा अधिक कोरडी होते अशावेळी व्हिटॅमिन ए, ई आणि सी घेतल्याने त्वचा मुलायम बनण्यास मदत मिळते. यावेळी बदामाचे तेल लावण्याने फायदा होऊ शकतो.

> त्वचेच्या छिद्रांची काळजी घ्या – दिवाळीनंतर त्वचा व्यवस्थित साफ करणे खूप महत्वाचे आहे. प्रदुषणामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये धूळ जमा होते. अशावेळी त्वचेचे छिद्र साफ करण्यासाठी प्रथम आपला चेहरा चांगल्या फेस वॉशने धुवा, त्यानंतर तेलाची मालिश करा. त्यानंतर एका चांगल्या स्क्रबने चेहरा स्वच्छ धुवा. (हेही वाचा: गळ्यावर आलेले काळे डाग 'या' घरगुती उपायांनी करा दूर)

सनस्क्रीन लावण्यास विसरू नका - सनस्क्रीन आपला चेहऱ्याचा कोरडेपणा कमी करतो. दिवाळीच्या प्रदूषणामुळे चेहरा कोरडा झाला असेल तर, रोज सनस्क्रीम लावूनच घराबाहेर पडा.

डेड स्कीन काढून टाका – चेहऱ्याची चमक पुन्हा प्राप्त करण्यासाठी चेहऱ्याचा मऊ ब्रश किंवा स्क्रब वापरू शकता. प्रदुषणामुळे निर्माण झालेली डेड स्कीन काढून टाकली नाही तर चेहरा अजूनच कोरडा होईल. तसेच मुरुमांचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे मुलतानी मिट्टी अथवा स्क्रब वापरून चेहऱ्यावरची डेड स्कीन काढून टाका.

दरम्यान, या छोट्या मोठ्या उपायानंतर तुम्ही एखादा चांगला मास्क लावून त्वचा पुन्हा मूळपदावर अनु शकता. अशावेळी चारकोल मास्क चा फायदा होईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif