IPL Auction 2025 Live

Couples Who Drink Together May Live Longer: 'जी जोडपी एकत्र मद्यपान करतात ते अधिक आनंदी-निरोगी राहतात व दीर्घ आयुष्य जगतात'; अभ्यासात मोठा खुलासा

यामध्ये म्हटले आहे की, दोन्ही पार्टनर्सना जर दारू पिण्याची सवय असेल तर त्यांनी एकत्र मद्यपान करायला हवे.

Couples Who Drink Together May Live Longer (Photo Credit : Pixabay)

Couples Who Drink Together May Live Longer: मादक पेयांचे (Alcoholic Beverages) सेवन करणे, ही सर्वसाधारणपणे वाईट सवय मानली जाते. डॉक्टर अनेकदा मद्यपानाचा (Alcoholism) विरोध करतात, मात्र नुकतेच एका संशोधनात मद्य सेवनाबाबत धक्कादायक दावा करण्यात आला आहे. संशोधनात दारू पिण्याबाबत सकारात्मक बाबी दिसून आल्या आहेत. यामध्ये असा दावा केला जात आहे की, जेव्हा जोडपे एकत्र मद्यपान करते तेव्हा दोन्ही पार्टनर्स अधिक आनंदी आणि निरोगी राहतात. तसेच जी जोडपी एकत्र मद्यपान करतात ती जास्त काळ जगतात. संशोधनात चांगल्या वैवाहिक परिणामांसाठी एकत्र दारू पिण्याचे फायदे दर्शविले आहेत.

मात्र संशोधनाने लोकांना जास्त प्रमाणात मद्यपान करण्यास प्रोत्साहित केले नाही; जोडप्यांना फक्त एकत्र मद्य पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये म्हटले आहे की, दोन्ही पार्टनर्सना जर दारू पिण्याची सवय असेल तर त्यांनी एकत्र मद्यपान करायला हवे. एकसारख्या सवयी आणि छंद शेअर केल्याने नाते अधिक घट्ट होते.

या संशोधनात गेल्या दोन दशकांमधील जवळपास 4,500 जोडप्यांचा अभ्यास करण्यात आला. अभ्यासात असे आढळून आले की, ज्या जोडप्यांना एकत्रपणे दारू पिण्याची सवय होती, ते दाम्पत्य एकत्र दारू पिण्याची सवय नसलेल्या जोडप्यांपेक्षा जास्त काळ जगले. ज्या जोडप्यांमध्ये मद्यपानाच्या सवयी विसंगत होत्या किंवा भागीदारांपैकी फक्त एकजण मद्यपान करत होते त्यांच्या आयुष्यावर काही परिणाम झाला नसल्याचे आढळून आले. (हेही वाचा: Cancer Capital of The World: भारत बनला 'जगातील कॅन्सरची राजधानी'; कर्करोग प्रकरणांमध्ये होत आहे झपाट्याने वाढ, अहवालात समोर आली धक्कादायक माहिती)

मिशिगन विद्यापीठातील संशोधक प्राध्यापक डॉ. किरा बर्डिट यांनी त्यांच्या संशोधनात असे दाखवून दिले की, एकसारख्याच मद्यपानाच्या सवयी असलेल्या जोडप्यांचे संबंध चांगले असतात. या तत्त्वाला ‘ड्रिंकिंग पार्टनरशिप’ सिद्धांत म्हणतात. या अभ्यासाचे उद्दिष्ट दाम्पत्यांवर अल्कोहोलचे सेवन आणि मृत्यूचे परिणाम पाहणे होते, हे होते असे प्राध्यापक म्हणाले. संशोधनानुसार, जोडीदारासोबत दारू पिण्याची सवय नात्यातील जवळीक वाढवू शकते. मात्र हलक्या किंवा प्रमाणात घेतलेल्या अल्कोहोलच्या तुलनेत जास्त मद्यपान केल्याने जोडप्यांमध्ये भांडणे आणि असंतोष वाढतो, असेही अभ्यासात म्हटले आहे. जेव्हा जास्त मद्यपान केले जाते तेव्हा नातेसंबंध तुटूही शकतात.