Coronavirus: लसीकरणामध्ये वेग न आल्यास आणखी जीवघेणा ठरु शकतो डेल्टा वेरियंट, WHO ने दिला इशारा
डब्लूएचओ यांनी असे म्हटले डेल्टा वेरियंट आपल्यासाठी इशारा देतोय की, त्याच्या विरोधात लढण्यासाठी लवकरच पावले उचलावीत.
WHO ने जगातिल देशांना आवाहन केले आहे की, जर लसीकरणाच्या अभियानात वेग आला नाही तर कोरोनाचे नवे वेरियंट भविष्यात अधिक जीवघेणे ठरु शकतात. डब्लूएचओ यांनी असे म्हटले डेल्टा वेरियंट आपल्यासाठी इशारा देतोय की, त्याच्या विरोधात लढण्यासाठी लवकरच पावले उचलावीत. नाहीतर स्थिती अधिक गंभीर होऊ शकते. डब्लूएचओ यांनी पुढे असे म्हटले की, स्थिती अधिक गंभीर होण्यापूर्वी लसीकरणावर अधिक जोर देण्याची गरज आहे. त्यांनी असे ही म्हटले, डेल्टा वेरियंटचे धोकादायक परिणाम पाहता त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याची गरज आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत सर्व देशात कमीत कमी आपल्या 10 टक्के लोकसंख्येचे लसीकरण करण्याची गरज आहे.
वेगाने पसणारा डेल्टा वेरियंट आतापर्यंत 132 देशांमध्ये थैमान घालत आहे. डब्लूएचओचे आपत्कालीन निर्देशक मायकल रेयान यांनी असे म्हटले की, डेल्टा आपल्यासाठी एक इशारा आहे. यापूर्वी सुद्धा धोकादायक वेरियंट समोर आले असून त्याच्या विरोधात कारवाई करणे गरजेचे आहे. डब्लूएचओचे प्रमुख Tedros Adhanom Ghebreyesus यांनी असे म्हटले की, आता पर्यंत चार वेरियंट संबंधित चिंता व्यक्त केली जात आहे. जो पर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव पसरत आहे तोपर्यंत नवे वेरियंट समोर येणार आहेत. टेडरोस यांनी म्हटले की, गेल्या चार आठवड्यात डब्लूएचओच्या 6 क्षेत्रातील पाच मध्ये 80 टक्के दराने संक्रमण वाढत आहे.(जगात पहिल्यांदाच दोन वेगवेगळ्या लसींच्या कॉकटेलवर अभ्यास; Sputnik V आणि AstraZeneca ची लस दिली एकत्र, जाणून घ्या परिणाम)
डेल्टावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत. त्याअंतर्गत सोशल डिस्टंन्सिग, फेस मास्क, स्वच्छतेची काळजी, गरज नसल्यास घराबाहेर न पडणे असे उपाय केले जाऊ शकतात. यामुळे डेल्टाचा स्ट्रेन थांबण्यास मदत होईल. खासकरुन जर लस घेतली गेली असेल तर हा वेरियं नियंत्रणात येऊ शकतो. डब्लूएचओच्या मते व्हायरस आता वेगाने पसरत चालला आहे. यासाठी आपल्याला गेम प्लॅनवर वेगाने काम करावे लागणार आहे. यासाठी लसीकरण ही महत्वाची बाब आहे.