Coronavirus Symptoms: खोकला, ताप यांसह समोर आली कोरोना विषाणूची नवीन सहा लक्षणे, घ्या जाणून

खोकला, ताप आणि श्वासोच्छवासाच्या अडचणी

कोरोना व्हायरस लक्षणे (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोना विषाणू (Coronavirus)बाबत जितकाही रिसर्च झाला त्यामधून आतापर्यंत हेच सांगितले गेले आहे की, विषाणूच्या संसर्गाची 3 मुख्य लक्षणे (Symptoms) असू शकतात. खोकला, ताप आणि श्वासोच्छवासाच्या अडचणी. हीच लक्षणे भारत सरकारच्या आरोग्य सेतू अ‍ॅपवरही सांगितली गेली आहेत. मात्र आता अमेरिकेच्या आरोग्य आणि मानसिक सेवा विभागाच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध द्वारे त्यांच्या वेबसाइटवर कोरोना विषाणूची आणखी 6 संभाव्य लक्षणे नमूद केली आहेत. कोरोना विषाणू जितक्या लवकर बदलत आहेत, तितक्या लवकर त्याची लक्षणेही बदलत आहेत.

ही लक्षणे इतकी सामान्य आहेत की, फक्त रुग्णाला पाहून या विषाणूचे निदान करणे अवघड आहे. त्यासाठी चाचणीच करणे गरजेचे आहे.

आतापर्यंत कोरोना विषाणूच्या लक्षणांमध्ये ताप, खोकला, श्वास घेण्यात अडचण यासारख्या लक्षणांचा समावेश होता. परंतु आता सहा नवीन लक्षणेही समोर आली आहेत. अमेरिकेच्या सीडीसी (CDC) मध्ये कोरोना विषाणूची थंडी, सर्दी, स्नायूदुखी, डोकेदुखी, घसा खवखवणे आणि गंधाची जाणीव न होणे अशी सहा नवीन लक्षणे समोर आली आहेत. यासह आता कोरोना विषाणूची एकूण नऊ लक्षणे आढळली आहेत. अशा परिस्थितीत, जर आपल्याला यापैकी कोणतीही लक्षणे दिसली तर आपल्याला कोरोना संसर्ग झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

ही सर्व लक्षणे इन्फ्लूएन्झा, आरएसव्ही किंवा श्वसनक्रियाबाबतीत व्हायरस किंवा श्वासोच्छवासाच्या काही विषाणूजन्य संक्रमणांमध्ये देखील दिसतात. म्हणूनच, अशा लक्षणांचे मूळ शोधून काढण्यासाठी याची चाचणी करणे गरजेचे आहे. (हेही वाचा: Self Isolation Meaning: सेल्फ आयोसेलेशन म्हणजे नेमकं काय, यावेळी कोणती काळजी घ्यावी? Qurantine आणि विलगीकरणात 'हा' आहे फरक)

कोरोना व्हायरस हा जगातील पहिला असा व्हायरस आहे, ज्याबद्दलचे संशोधन हळूहळू चुकीचे असल्याचे सिद्ध होत आहे. कोरोनाबद्दल अद्याप कोणतीही अचूक माहिती नाही, यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे काळानुसार कोरोना विषाणूचे स्वरूप बदलत आहे आणि त्याची लक्षणे देखील बदलत आहेत. कोरोनाच्या टाइप-ए आणि टाइप-बी या दोन्ही प्रकारांचा प्रसार अमेरिकेत झाला आहे, म्हणूनच मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण तिथे आहे. भारतीय रुग्णांमध्ये आतापर्यंत 17 पेक्षा जास्त देशांमधील व्हायरस सापडले आहेत.