कोरोना विषाणूबद्दल माहिती: Covid 19 वर मात केल्यानंतर पुन्हा कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो का?

एकदा कोव्हिड 19 वर मात केली तर पुन्हा शरीरात कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो का? पहा या तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर काय?

Coronavirus Outbreak | Representational image (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसचं थैमान चीन पासून सुरू होऊन आता जगभर पसरलं आहे. इटली, स्पेन, फ्रांस मध्ये कोरोनाबाधितांचा दिवसागणिक वाढणारा मृत्यूचा आकडा Covid 19 आजाराबद्दल अधिक भीती निर्माण आहे. दरम्यान भारतामध्ये कोरोना बाधितांचा आकडा 446 आहे. दरम्यान यामध्ये 36 जण कोरोनामुक्त झाले. महाराष्ट्रातही पुण्यात दुबई हून परतलेलं जोडपं कोरोनाबाधित असल्याची माहिती जेव्हा समोर आली तेव्हा हे जागतिक आरोग्य संकट राज्याच्या उंबरठ्यापाशीदेखील येऊन ठेपल्याची जाणीव झाली. मात्र सुदैवाने यांच्यामध्ये सौम्य लक्षणं असल्याने आता ते उपचारानंतर कोरोनामुक्त असल्याने लवकरच घरी परतणार आहेत. मात्र कोरोना हा व्हायरस संसर्गाने पसरत असल्याने कोरोनामुक्त झाल्यानंतरही त्याचा पुन्हा धोका बळावू शकतो का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. प्रामुख्याने लहान मुलं आणि वयोवृद्ध या आजाराचे लक्ष्य असल्याने त्यांना जपणं गरजेचे आहे. मग पहा जगभरातील तज्ञ मंडळी कोव्हिड 19 या आजाराचा पुन्हा पुन्हा धोका बळावू शकतो का? याबद्दल काय सांगतात?

COVID-19 चा दुसर्‍यांदा संसर्ग झाला असं कुठे घडलंय का?

कोरोना व्हायरस या नावानेच अनेकांच्या मनात सध्या धडकी भरते. पण जपानमध्ये एका 40 शीत असणार्‍या महिलेला दुसर्‍यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याने हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं. दरम्यान तिला खरंच दुसर्‍यांदा संसर्ग झाला होता की ती पहिल्यांदाच संसर्ग झाल्यानंतर पूर्ण बरी झाली नव्हती याबाबत साशंकता आहे. दरम्यान वारंवार टेस्ट किट वापरलं जात असल्याने निकालाबाबत अनेकदा गोंधळ होऊ शकतो. जपान सरकारच्या माहितीनुसार, हा टेस्टिंग क्वालिटीचा दोष असू शकतो. Coronavirus Outbreak: मास्क वापरून COVID 19 चा धोका टाळता येऊ शकतो का? जाणून घ्या या '8' टीप्स.

कोरोना व्हायरसच्या पुन्हा संपर्कात आल्यास शरीर कसं प्रतिसाद देतं?

रिसर्च नुसार, एकदा कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला तर पुन्हा त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून शरीरात पुन्हा काही महिन्यांसाठी पुरेशी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. दुसर्‍यांदा संसर्ग होतो तेव्हा शरीराला, रोगप्रतिकारक शक्तीला त्या विषाणूची जाणीव होते. त्यामुळे या व्हायरसपासून पुन्हा आजारी पडण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे एकदा त्याचा सामना केल्यानंतर पुन्हा त्याचा धोका वाढण्याची शक्यता कमी असते.

कोरोना व्हायरस हा शरीरात स्वरूप बदलू शकतो. त्यामुळे एका व्यक्तीमधून दुसर्‍या व्यक्तीच्या शरीरात जाताना तो सहाजिकच आपलं मूळ रूप बदलू शकतो. अजूनही novel coronavirus बद्दल जगात संशोधन सुरू आहे. अजूनही आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्र कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी लस आणि औषध शोधण्यासाठी प्रयत्न करत आहे. शिंकण्याच्या आणि खोकल्याच्या तुषारांमधून हा व्हायरस पसरत असल्याने आता त्याचा संसर्ग रोखण्यासाठी केवळ सोशल डिस्टंसिंग हा एकच खबरदारीचा उपाय आपल्याकडे आहे.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.) 

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif