Coronavirus: कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढ्यात कोण बणू शकतं 'कोविड योद्धा'? कसा कराल संपर्क, काय आहेत अटी?

जाणून घ्या कोविड योद्धा होण्यासाठी आवश्यक अटी. कसा कराल सरकारला संपर्क.

Covid Yoddha | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Covid Yoddha Email ID: कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्धच्या लढा आता अधिक व्यापक झाला आहे. या व्यापक लढ्यात वैद्यकीय क्षेत्रात काम केलेल्या मात्र अता सेवानिवृत्त असलेल्या नागरिकांनाही सामावून घेतले जाणार आहे. अशी सेवा देणाऱ्या नागरिकांना 'कोविड योद्धा' (Covid Yoddha) म्हणून ओळखले जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला उद्देशून केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये त्याबाबत माहिती दिली. उद्धव ठाकरे यांनी कोविड योद्धा होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना सरकारशी संपर्क करता यावा, यासाठी एक ईमेल आयडीही या वेळी सांगितला. जाणून घ्या कोविड योद्धा होण्यासाठी आवश्यक अटी. कसा कराल सरकारला संपर्क.

कोविड योद्धा पात्रता (Covid Yoddha Qualification)

(हेही वाचा, CM Uddhav Thackeray Live: कोरोनाला रोखण्यासाठी फीवर क्लिनिक्स ते सुसज्ज हॉस्पिटल महाराष्ट्र सरकारचा मास्टर प्लॅन; जाणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फेसबूक लाईव्ह मधील महत्त्वाचे मुद्दे)

दरम्यान, कोरोना व्हायरस संकट निवारण, अनुभव, सूचना, तक्रारी अथवा इतर कारणांसाठी कोणत्याही नागरिकांनी या ईमेलवर संपर्क करु नये. हा ईमेल आयडी केवळ कोविड योद्धा होण्यासाठी संपर्क करु इच्छिणाऱ्या व्यक्तिसाठीच आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे इतर मंडळींनी या इमेल आयडीवर संपर्क करुन हा ईमेल आयडी ब्लॉक करु नये, असे अवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.