थंडीत Clove Tea प्या, आजारपण दूर पळवा!
तर पाहूया थंडीत लवंगाची चहा पिण्याने आरोग्याला कोणते फायदे होतात.
लवंग ही सर्वत्र प्रकरे औषधी गुणांनी संपूर्ण असल्याचे मानले जाते. तर उन्हाळापेक्षा थंडीत लवंगाचे सेवन जास्त प्रमाणात केले जाते. लवंग मध्ये फॉस्फरस, पोटॅशिअम, प्रोटीन, लोह यासारखे अनेक गुण असतात. मात्र थंडीत जास्त करुन गरम पदार्थ म्हणून चहाचे सेवन केले जाते.
जर तुम्ही थंडीत लवंग असलेली चहा प्यायलात तर ऐन थंडीच्या दिवसात आजारी पडण्याची शक्यता कमी होते. तर पाहूया थंडीत लवंगाची चहा पिण्याने आरोग्याला कोणते फायदे होतात.
>पचनक्रिया सुरळीत होते
लवंग असलेली चहा प्यायलाने पचनक्रियेसंबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच लवंगाची चहा पचनक्रिया सुरळीत ठेवून एसीडीटी दूर पळवते. जेवण करण्यापूर्वी लवंगाची चहा पिणे उत्तम.
> दाताचे दुखणे कमी होते
थंडीत दाताच्या दुखण्याने डोके वर काढले असेल तर लवंगाची चहा प्यायल्यास उत्तम. त्यामुळे दातांच्या वेदना कमी होऊन दुखण्यापासून आराम मिळतो. तसेच दाताखाली लवंग ठेवून ही दाताचे दुखणे कमी होऊ शकते.
>खोकला दूर होतो
छातीतील खोकल्याचे प्रमाण वाढल्यास लवंगाची चहा प्यायल्याने खोकला पासून आराम मिळतो. तर लवंगमधील यूगेनॉलमुळे छातीत साचलेला कफ मोकळा होण्यास मदत होते. तसेच दररोज सकाळी ही चहा प्यायल्याने कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होत नाही.
> अस्थमा असेल तर...
लवंग पाण्यामध्ये उकळवून त्याचा काढा बनवावा. त्यानंतर या काढ्यामध्ये मध टाकून दिवसातून तीन वेळा सेवन करावे. असे केल्याने अस्थमा असणाऱ्या रुग्णांना त्यांच्या या आजारपणापासून थोडा आराम मिळतो. तसेच लवंगाचे तेल श्वसनाशी निगडीत समस्यांना दूर ठेवण्यास मदत करते.