Cardiac Arrest While Having Sex: सेक्स करताना कार्डीऐक अरेस्ट, हृदयविकार तज्ज्ञ काय सांगतात? घ्या जाणून

सेक्स आरोग्यास चांगला की वाईट? कोणत्या लोकांनी सेक्स करण्यापूर्वी काळजी घ्यावी? या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारा आणि उकल करणारा हा संवाद.

Sex And Cardiac Arrest (Photo Credit - ANI/Twitter)

सेक्स (Sex) करत असताना पुरुषाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना नागपूर (Nagpur) येथे घडली. या घटनेमुळे समान्य नागरिक आणि वैद्यकीय वर्तुळातही चांगलीच खळबळ उडाली. सामान्य नागरिकांच्या मनात प्रश्नांचे मोहोळ निर्माण झाले तर वैद्यकीय वर्तुळांत अनेक प्रतिक्रिया उमटल्या. या घनेनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांचे निराकरण कण्यासाठी एएनआयने रिजन्सी हॉस्पिटलचे डॉ. अभिनित गुप्ता यांच्याशी संवाद साधला. या संवादादरम्यान, अनेक गोष्टींचा उलघडा झाला. जाणून घ्या हा संवाद.

नेमकी घटना काय घडली?

अजय पार्टेकी (Ajay Parteki) नावाच्या एका 28 वर्षीय तरुणाचा नागपूर येथे मैत्रिणीसोबत लॉजवर सेक्स करताना मृत्यू झाला. सेक्स करतानाच हृदयविकाराच झटका आल्याने ही घटना घडली. अजय हा व्यवसायाने वाहनचालक आणि वेल्डिंग तंत्रज्ञ होता. पार्टेकी याला गेल्या काही दिवसांपासून ताप येत होता अशी प्राथमिक माहिती आहे. मात्र, पोलिसांना अंमली पदार्थ सेवन किंवा औषधोपचाराचा इतर काही पुरावा सापडला नाही.

वरील घटनेनंतर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चलबिचल पाहायला मिळाली. खास करुन तरुणांसोबत. त्यामुळे या घटनेवरुन निर्माण झालेल्या उनुत्तरीत प्रश्नांची उकल डॉ. अभिनीत गुप्ता यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाचा हा संवाद. (हेही वाचा, Cardiac Arrest: वृत्तपत्र वाचत असताना AIADMK आमदाराचा मृत्यू)

प्रश्न: हृदयविकाचाच्या दृष्टीने सेक्स/लैंगिक संबंध हा एक धोका ठरु शकतो का?

डॉ. अभिनित गुप्ता: लैंगिक संबंध करताना शारीरिक जवळीक आणि हालचाल ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती एक प्रकारची एरोबिक शारीरिक क्रिया (Aerobic Physical Activity) आहे. त्यामुळे ती हृदयविकाराच्या दृष्टीने धोकादायक मानता येणार नाही. किंबहुना नसते. त्यामळे सुदृढ हृदय असलेल्या आणि इतरही सामान्य व्यक्तीसाठी त्याबाबत काळजीचे कारणनाही.

प्रश्न: हृदयाशी संबंधित आजार असणाऱ्या व्यक्तीसाठी सेक्स धोकादायक आहे का?

डॉ. अभिनित गुप्ता: नाही कोणत्याही प्रकारचा सेक्स हा तुमच्या शरीराचे ठोके वाढवतो. तुम्ही ज्या गतीत हालचाल करता त्यावर हृदयाच्या ठोक्यांचे प्रमाण कमी-अधिक होते. सेक्स करताना हृदयाच्या ठोक्यांचे प्रमाण कमी अधिक होणे ही देखील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. तुम्ही जर सलग चालण्यासाठी किंवा एका दमात जिने चढण्यासाठी सक्षम आहात तर तुमचे हृदय चांगले काम करते आहे. तुम्ही सेक्स करताना कोणतीही शंका मनात आणण्याची गरज नाही. उलट, कोणत्याही प्रकारचा व्यायाम, सेक्स करताना केलेली कृती ही आरोग्याच्या दृष्टीने दीर्घकालीन फायदाच देणारी असते. मात्र जर आपल्या छातीत दुखत असेल. हृदयाशी संबंधीत काही गंभीर आजार असेल, श्वासोच्छवासाचा त्रास होत असेल किंवा हृदयाचे ठोके अनियमित होत असतील तर त्याने किंवा तिने सेक्स अथवा कोणतेही भारी शारीरिक श्रम टाळावेत. काही लोकांना औषधे सुरु असतात. अशा लोकांनी सेक्स अथवा शारीरिक श्रमाची कामे करण्यापूर्वी डॉक्टरांशी आवश्यक सल्लामसलत करावी. खास करुन रक्तदाब कमी अधिक होणाऱ्या व्यक्तींनी.

प्रश्न: सेक्स करताना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण किती आहे?

डॉ. अभिनित गुप्ता: सेक्स करताना हृदयविकाराचा झटका अल्याच्या घटना जगभरात फारच कमी घडल्या आहेत. ज्या घटना घडल्या आहे त्या दुर्मिळातील दुर्मिळ मानल्या जातात. त्यामुळे अशा घटनांचे प्रमाण अगदीच कमी आहे. साधारण आठवड्यातून एकदा लैंगिक संबंध ठेवणाऱ्या प्रत्येक 10,000 लोकांपैकी फक्त 2 ते 3 जणांना हृदयविकाराचा झटका येतो, असे हे प्रमाण विविध सर्व्हेंमध्ये पुढे आले आहे. उलट लैंगिक संभोगामुळे तुमच्या हृदयाची ऑक्सिजनची मागणी वाढते आणि तुमचे हृदयाचे ठोके वाढतात. या वेळी रक्तदाब वाढण्याचे प्रमाण जिण्याच्या दोन पायऱ्या चढताना जितता वाढतो साधारण तेवढे असते. अर्थात हे प्रमाण सामान्य व्यक्तीसाठी आहे.

प्रश्न: हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीने सेक्सचे काही फायदे आहेत का?

डॉ. अभिनित गुप्ता: सेक्स करण्यास घाबरण्याची काहीच गरज नाही. उलट हृदयाचे आरोग्य आणि शारीरिक रस्ताभीसरण आदी दृष्टीने सेक्स फायदेशीरच ठरतो. उलट आठवड्यातून किमान दोनदा सेक्स करणाऱ्या पुरुषांना आणि समाधानकारक लैंगिक जीवन जगणाऱ्या महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी आहे. सेक्स हा व्यायामाचा एक प्रकार आहे आणि तुमचे हृदय मजबूत करण्यास, रक्तदाब कमी करण्यास, तणाव कमी करण्यास आणि झोप सुधारण्यास मदत करतो. याशिवाय नातेसंबंधातील जवळीकता बंध वाढवते ज्यामुळे नैराश्य दूर होते आणि चिंता आणि आत्मविश्वास वाढवतो, त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

दरम्यान, या संवादाच्या शेटी डॉ. अभिनीत गुप्ता यांनी सांगितले की, हृदयविकाराच्या या सामान्य लक्षणांकडे लक्ष द्या. तुम्हाला जर छातीत दुखणे, श्वास लागणे, हात, मान आणि खांद्यामध्ये वेदना, मळमळ, भरपूर घाम येणे, चक्कर येणे, थकवा, अशी लक्षणे दिसत असतील तर मात्र तातडीने डॉक्टरांना भेटून सल्ला घ्या.