कॅन्सरची एका वर्षात 300 टक्क्यांनी वाढ, गुजरात अव्वल स्थानावर
त्यानुसार 324 टक्क्यांनी कॅन्सरची एका वर्षभरात वाढ झाली आहे. याबबात अधिक माहिती नॅशनल हेल्थ प्रोफाइल 2019 च्या अहवाल समोर आला आहे.
वर्ष 2017 ते 218 मध्ये कॅन्सर या गंभीर आजारपणात ओरल कॅन्सर, सर्वाइकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर सहभागी आहेत. त्यानुसार 324 टक्क्यांनी कॅन्सरची एका वर्षभरात वाढ झाली आहे. याबबात अधिक माहिती नॅशनल हेल्थ प्रोफाइल 2019 च्या अहवाल समोर आला आहे. ही प्रकरणे राज्यातील एनसीडी क्लिनिक्स मध्ये दाखल करण्यात आली आहेत. तर 2018 मध्ये 6.5 करोड लोक या क्लिनिक मध्ये स्क्रिनिंगसाठी येतात. त्यामधील 1.6 लाख लोकांना कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे. 2017 मध्ये 39,656 प्रकरणे दिसून आली आहेत. मात्र एनसीडी क्लिनिक्समध्ये 2017 ते 2018 दरम्यान पेशन्टची संख्या डबल झाली आहे. यापूर्वी 3.5 करोड होती ती आता 6.6 करोडवर पोहचली आहे.
एक्सपर्ट यांचे असे म्हणणे आहे की, आजार वाढण्यामागील मुख्य कारण म्हणजे बदलती जीवनशैली आहे. त्यामध्ये व्यक्तीच्या आयुष्यातील ताण, खाण्यापिण्यासंबधित सवयी यांसारख्या गोष्टी सहभागी आहेत. 2018 मध्ये कॅन्सरची प्रकरणे गुजरात मध्ये दिसून आली आहेत. त्यानंतर कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि वेस्ट बंगाल मध्ये आढळली आहेत. गुजरात येथे 2017 मध्ये 3939 कॅन्सरची प्रकरणे समोर आली आहेत. ती 2018 पर्यंतचा त्याचा आकडा 72,169 वर पोहचला आहे.(सुकलेली पपई खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?)
तसेच आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशात जेथे डायग्नोसची प्रकरणे कमी होती त्यात सुद्धा वाढ झाली आहे. कॅन्सर हॉस्पिटलचे सीनिअर कंसल्टेंट ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर हरप्रीत सिंह यांनी असे म्हटले आहे की, ओरल कॅन्सरसाठी सर्व तंबाखुजन्य पदार्थ कारणीभुत आहेत. खासकरुन दारु सेवन करताना तंबाखुजन्य पदार्थ घेतल्यास आरोग्याचा त्याचा धोका संभवतो. ब्रेस्ट कॅन्सरपासून वाचण्यासाठी डॉक्टर्स ब्रेस्ट फिडिंगचा सल्ला देतात.