Bone Death: कोविड 19 वर मात केलेल्यांमध्ये आढळतोय Avascular Necrosis नवा आजार; जाणून घ्या त्याची लक्षणं, कारण आणि प्रतिबंधात्मक उपाय
बोन डेथ आजाराची नेमकी लक्षणं काय आहेत? कोणाला होतो? त्याला रोखू कसा शकतो? हे सारं इथं घ्या जाणून.
महाराष्ट्रासह देशात आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही दिवसागणिक जसा या वायरस वर अभ्यास वाढत आहे तशी त्या बद्दलची नवनवी निदर्शनं समोर येत आहेत. कोविड 19 आजारानंतर काही जणांमध्ये म्युकरमायसोसिस आजार आढळला होता आणि आता कोविड 19 नंतर बोन डेथ (Bone Death) हा अजून नवा प्रकार समोर येत आहे. avascular necrosis म्हणून देखील तो ओळखला जात आहे. महाराष्ट्रात आता या आजाराचे रूग्ण देखील समोर येत आहेत. Avascular Necrosis हा त्या लोकांमध्ये आढळत आहे ज्या तरूण मंडळींनी कोविड 19 च्या काळात स्टिरॉईडचे अधिक प्रमाणात सेवन केले आहे. मग या बोन डेथ आजाराची नेमकी लक्षणं काय आहेत? कोणाला होतो? त्याला रोखू कसा शकतो? हे सारं इथं घ्या जाणून.
Bone Death किंवा Avascular Necrosis नेमका कशामुळे?
Avascular Necrosis मध्ये बोन टिश्यूचं नुकसान होतं. हाडांना होणारा रक्तपुरवठा पूर्णपणे किंवा अंशतः थांबला तर हा आजार बळावू शकतो. यामध्ये हाडं कमकुवत पडतात आणि बोन टीश्यू मरतात. अति प्रमाणाट अल्कोहलचे सेवन केल्यास किंवा अति स्टिरॉईड घेतल्यानेही हा आजार बळावत असल्याचं समोर आलं आहे. Mucormycosis: कोविड 19 वर मात केलेल्या रूग्णांमध्ये Post Recovery त आढळून येणार्या या गंभीर Fungal Infectionची लक्षणं काय?
बोन डेथची लक्षणं काय?
Avascular Necrosis चा त्रास असणार्यांमध्ये सुरूवातीला सौम्य सांधेदुखी जाणवते. जसजशी परिस्थिती बिघडते तशा वेदना वाढत जातात. या आजारात हळूहळू रूग्णाच्या सांध्याच्या हालचालींवर बंधनं येतात.
आजार रोखायला काय करू शकत?
अतिप्रमाणात मद्यपान टाळणं आवश्यक आहे. मद्यपानाप्रमाणेच तुम्हांला धुम्रपानाची सवय असल्यास ती देखील कमी करणं गरजेचे आहे. स्टिरॉईडचे अति डोस देखील Avascular Necrosis आजार बळावण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे तुम्ही तशी औषध घेत असल्यास त्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवा. शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी देखील नियंत्रणामध्ये राहील याची काळजी घ्या. फॅट्सदेखील शरीरात हाडांना होणार्या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण करू शकतात.
टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहला आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याला पर्याय नाही. अचूक निदानासाठी डॉक्टरांचा सल्ला वेळीच घेणे आवश्यक आहे.