Health Tips: मधुमेह, पित्त, कफ यांसारख्या अनेक आजारांवर गुणकारी ठरेल तमालपत्र, जाणून घ्या फायदे
मात्र गरम मसाल्यातील हा गुणकारी पदार्थ फारच फायदेशीर आहे.
गरम मसाला म्हटला की लवंग, काळी मिरी, हळद, खसखस यांसारख्या अनेक मसाल्यांच्या आर्वजून उल्लेख होतो. त्यात आणखी एक पदार्थ असतो तो म्हणजे तमालपत्र (Cinnamon Leaf)... जेवणात ब-याचदा गरम मसाल्याचा स्वाद येण्यासाठी आपण तमालपत्राचा वापर करतो. विशेषत: पुलाव, बिर्याणी यामध्ये तमालपत्र वापरल्यास पदार्थांचा छान चव येते आणि तमालपत्राचा छानही स्वादही लागतो. मात्र खाण्यापलीकडेही तमालपत्राचा औषधी पान म्हणूनही बरेच फायदे आहेत हे तुम्हाला माहित आहे का? मधुमेहापासून अनेक आजारांवर तमालपत्र गुणकारी ठरू शकते.
अनेकदा आपल्याला आवडत नाही म्हणून आपण ब-याचदा त्याचा जेवणात समावेश करत नाही. मात्र गरम मसाल्यातील हा गुणकारी पदार्थ फारच फायदेशीर आहे.
जाणून घ्या तमालपत्राचे फायदे:
1. तमालपत्रामुळे मधुमेह असलेल्या रुग्णाचा त्रास थोडा कमी होतो आणि त्याच्या रक्तातील साखरेची पातळी संतुलित राखण्यास मदत करत असल्यामुळे आराम मिळतो.हेदेखील वाचा- Winter Health Tips: हिवाळ्यात कोणता आहार आहे तुमच्या शरीरास हितवर्धक, जाणून घ्या सविस्तर
2. तमालपत्राने मुतखडा आणि किडनीसंबंधीत ज्या काही समस्या असतील तर त्या दूर होतात. त्यासाठी तमालपत्र पाण्यात टाकून पाणी उकळावे. उकळलेले पाणी थंड करुन प्यावे.
3. अपचन, पित्त, कफ झाला असेल तर तमालपत्राचा चहामध्ये वापर करा. आराम मिळेल.
4. तमालपत्राच्या तेलाने मसाज केल्यास तुम्हाला सांधेदुखी, पाठदुखी या त्रासापासून थोडीशी सुटका होईल.
हे सर्व उपाय करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. कारण तमाल पत्र हा गरम असल्यामुळे प्रत्येकाच्या शरीराला त्यातील उष्णता सहन होईलच असे नाही. तसेच जर तुम्हाला त्वचेचा काही आजार असेल तर हे उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)