Beauty Tips: नैसर्गिक पद्धतीने केसातील कोंडा दूर करण्यासाठी वापरा 'या' खास टिप्स
तज्ञांच्या मते व्हिटॅमिन-सी अभावी केसांच्या समस्या उद्भवतात. याशिवाय प्रदूषण आणि धूळ यामुळे डोक्यात कोंडा होतो. केसातील कोंडा वाढल्याने केसांची वाढ थांबते.
Beauty Tips: आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रदूषण आणि तणावामुळे महिलांना केसांच्या विविध समस्या उद्भवत आहेत. केसांमध्ये कोंडा होणं ही प्रमुख समस्या सध्या अनेक महिलांना सतावत आहे. तज्ञांच्या मते व्हिटॅमिन-सी अभावी केसांच्या समस्या उद्भवतात. याशिवाय प्रदूषण आणि धूळ यामुळे डोक्यात कोंडा होतो. केसातील कोंडा वाढल्याने केसांची वाढ थांबते. यासाठी, नियमित शैम्पूने केस धुणे आवश्यक आहे. तसेच केसांची मसाज करणंही आवश्यक आहे. यासाठी तुम्ही बदाम किंवा नारळ तेल वापरू शकता. यामुळे केसांना पोषण मिळते. आपल्या केसांमध्ये कोंडा झाला असल्यास तुम्ही खालील नैसर्गित आणि घरगुती उपायांचा अवलंब करू कोंडा घालवू शकता. चला जाणून घेऊयात केसांमधील कोंडा घालवण्याच्या खास टिप्स...(हेही वाचा - Covid-19 Could Cause Male Infertility: कोरोना विषाणूमुळे स्पर्मची निर्मिती करणाऱ्या Testicular Cells चे नुकसान झाल्याने पुरुषांमध्ये येऊ शकत वंध्यत्व; अभ्यासात करण्यात आला खुलासा)
- केसांमधून कोंडा दूर करण्यासाठी लिंबू, दही आणि तेल एकत्र करून केसांवर लावा. हे 15 ते 20 मिनिटे कोरडे होऊ द्या. यानंतर केस चांगले धुवा. आठवड्यातून दोनदा हा उपाय करा. यामुळे डोक्यातील कोंडा नाहीसा होतो.
- केसामधील कोंड्यापासून मुक्त होण्यासाठी आपण अंड्याचादेखील वापर करून शकता. अड्यांतील पिवळ्या बलक केसांना लावून कोंडा दूर होतो.
- केसांमधून डोक्यातील कोंडा काढून टाकण्यासाठी, शैम्पूऐवजी बेकिंग सोडा वापरा. नैसर्गिक मार्गाने कोंडा दूर करण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे.
- याशिवाय तुम्ही सफरचंदाचं व्हिनेगर देखील वापरू शकता. व्हिनेगरचा वापर केल्यानंतर 20 मिनिटांनंतर केस धुवा. याचा वापर केल्याने डोक्यातील कोंडापासून मुक्ती मिळते.
- तसेच तुम्ही केसातील कोंडा घालवण्यासाठी माउथवॉश देखील वापरू शकता. यासाठी आपल्या आवश्यकतेनुसार आपल्या केसांना माउथवॉश आणि पाणी (एक चमचा माउथवॉश आणि नऊ चमचे पाणी) लावा.
टीप - वरील टिप्स सामान्य माहितीसाठी आहेत. वरील सर्व टिप्स प्राप्त माहितीच्या आधारे सांगण्यात आल्या आहेत. यास सल्ला समजू नये. या उपायांचा वापर करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.