Bird Flu FAQs: अंडी आणि चिकन खाणे सुरक्षित आहे का? Avian Influenza धोका माणसाला किती? जाणून घ्या बर्ड फ्लू संसर्गामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे
बर्ल्ड फ्लू संसर्गाच्या काळात चिकन किंवा अंडी खाणे सुरक्षित आहे का? माणसाला बर्ल्ड फ्लू चा धोका कितपत आहे? यांसारखे अनेक प्रश्न तुम्हालाही पडले असतील. जाणून घेऊया या प्रश्नांची उत्तरे...
कोविड-19 (Covid-19) संकटामुळे धोक्यात आलेला पोल्ट्री व्यवसाय आता बर्ल्ड फ्लू (Bird Flu) च्या कचाट्यात सापडला आहे. देशभरात बर्ल्ड फ्लू ने धुमाकूळ घातला असून अनेक पक्षांचा मृत्यू होत आहे. याचा थेट परिणाम चिकन व्यवसायावर झाला असून चिकनच्या किंमतीत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र या राज्यांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून बर्ल्ड फ्लू च्या संसर्ग वाढला आहे. यामुळे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. (Bird Flu: एवियन फ्लू चा धोका! जाणून घ्या काय आहेत बर्ड फ्लूची लक्षणे, कारणे, उपचार आणि कशाप्रकारे करू शकाल बचाव)
बर्ल्ड फ्लू संसर्गाच्या काळात चिकन किंवा अंडी खाणे सुरक्षित आहे का? मांसाहार करताना काय खबरदारी घेणे गरजेचे आहे? माणसाला बर्ल्ड फ्लू चा धोका कितपत आहे? Avian Influenza चा संसर्ग होऊ नये म्हणून नेमकी काय काळजी घ्यावी? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. तुमच्या मनातील याच प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत. (Bird Flu Alert: 'बर्ड फ्लू' चा संसर्ग टाळण्यासाठी काय करावे? अंडी-चिकन खरेदी करताना घ्या 'ही' खबरदारी)
चिकन आणि अंडी खाणे सुरक्षित आहे का?
व्यवस्थित शिजवलेले चिकन आणि अंडी खाणे सुरक्षित असल्याचे सरकारने जारी केलेल्या नियमावलीत म्हटले आहे.
Avian Influenza चा संसर्ग माणसांना होतो का?
या फ्लू च्या संसर्ग प्रामुख्याने पक्षांना होतो. परंतु, बर्ल्ड फ्लू झालेल्या पक्षांच्या थेट संपर्कात आल्यास माणसांनाही याचा संसर्ग होऊ शकतो. परंतु, घाबरुन जाण्याचे कोणतेही कारण नाही.
उष्णतेमुळे हा व्हायरस मरतो?
मांस 70ºC वर 30 मिनिटांसाठी शिजवल्यास हा व्हायरस इनअॅक्टीव्ह होतो. त्यानंतर मांस, चिकन, अंजी खाणे पूर्णपणे सुरक्षित आहे.
यामुळे तुमच्या मनातील शंका दूर होण्यास नक्कीच मदत होईल. परंतु, बर्ल्ड फ्लू चा संसर्ग टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)