Disease-X: कोरोनानंतर आता डिजीज X रोगाचा धोका! WHO ने व्यक्त केली चिंता

सध्या त्याबद्दल फारशी माहिती नाही. पण शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, हा विषाणू खूप धोकादायक असेल आणि तो कोरोनापेक्षाही वेगाने पसरेल.

Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Disease-X: चीनमधील कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमुळे चीन सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. यामुळे जगातील इतर देशही तणावात आहेत. कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता चीनने अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू केले आहे. अशातचं आता जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) नव्या अहवालामुळे लोकांमध्ये आणखी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोविडचा दुसरा व्हेरियंट आला आणि डिजीज X ची चर्चा सुरू झाली. 2021 मध्ये, शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की भविष्यातील हा रोग इबोलापेक्षा जास्त प्राणघातक ठरू शकतो. या विषाणूजन्य आजाराने ग्रस्त सुमारे 80 टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. हा आजार सहसा पश्चिम आफ्रिकेत आढळतो.

इबोला विषाणूच्या शोधात महत्त्वाची भूमिका बजावणारे शास्त्रज्ञ जीन जॅक यांनीही डिजीज एक्स रोगाबाबत इशारा दिला. त्यांचा असा विश्वास आहे की, डिजीज X रोगाबद्दल कोणालाही काहीही माहिती नाही. कोविडच्या आधी डिजीज X वर चर्चा झाली होती. शास्त्रज्ञांनी त्याचे धोकेही सांगितले होते. पण त्यानंतर कोरोनाने 2 वर्षे कहर केला. चीन वगळता जगभर परिस्थिती नियंत्रणात आहे. पण पुन्हा एकदा डिजीज X ने लोकांची चिंता वाढवली आहे. (हेही वाचा - Aurangabad Measles: मुंबई पाठोपाठ औरंगाबादेत गोवरची एण्ट्री, दोन बालकांना गोवरची लागणी; प्रशासनाकडून विशेष सुचना जारी)

अलीकडेच, काँगोच्या इंगेड भागात तापाचे प्रकरण आढळून आले. या रुग्णाला रक्तस्त्रावाचा त्रासही होता. सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांचा असा विश्वास होता की, त्या व्यक्तीला इबोला झाला होता, पण रिपोर्ट नॉर्मल आला. त्यानंतर डॉक्टरांनी अंदाज लावला की हा दुसरा आजार आहे. हळूहळू त्यांची प्रकृती बिघडत गेली. त्या व्यक्तीला डिसीज एक्स नावाचा आजार असू शकतो, असे डॉक्टरांचे मत आहे.

डिजीज X म्हणजे काय?

शास्त्रज्ञांच्या मते, डिजीज X पूर्णपणे अज्ञात आणि अप्रत्याशित आहे. सध्या त्याबद्दल फारशी माहिती नाही. पण शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, हा विषाणू खूप धोकादायक असेल आणि तो कोरोनापेक्षाही वेगाने पसरेल. भविष्यात डिजीज रोग पसरण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - Vaccinated People Deaths In US Survey: धक्कादायक! अमेरिकेत लसीकरण झालेल्या 58 टक्के नागरिकांचा COVID मुळे मृत्यू)

शास्त्रज्ञांच्या मते, डिजीज X प्राणी आणि पक्ष्यांपासून सुरू झाला असावा. कारण या आजाराची लक्षणे इतर अनेक आजारांमध्येही दिसून आली आहेत. कोरोनाच्या बाबतीत, असे मानले जात होते की, हा आजार वटवाघळांपासून आला आहे. WHO ने सध्या डिजीज X ला भविष्यातील साथीच्या आजारांच्या यादीत शीर्षस्थानी ठेवले आहे. या रोगावरील संशोधनासाठी, WHO ने 300 शास्त्रज्ञांची एक टीम तयार करत आहे जे भविष्यात साथीच्या रोगांना कारणीभूत ठरू शकणारे जीवाणू आणि विषाणू ओळखतील. यासोबतच ही टीम या सूक्ष्मजंतूंची लस आणि उपचार यावरही काम करणार आहे.