Skin Cancer: ती म्हणाली, 'नाकावरच्या पिंपल्सला औषध द्या'; डॉक्टरांनी सांगितलं 'कॅन्सर आहे तुम्ही ट्रीटमेंट घ्या'

शस्त्रक्रियेनंतर, मिशेल बरी झाली. परंतु, हा आजार पुन्हा उद्धभवण्याची शक्यता वाढली आहे. असे म्हटले जाते की, काही प्रकरणांमध्ये कर्करोग पुन्हा उद्भवतो.

Pimples On Nose (PC - Wikimedia commons)

Skin Cancer: चेहऱ्यावर पिंपल्स (Pimples) असणे हे सामान्य आहे. साधारण सर्वांनाच चेहऱ्यावर किंवा शरीराच्या इतर भागावर मुरुम येण्याची समस्या असते. पण तुम्हाला माहित आहे का? हे मुरुमदेखील कर्करोगाचं (Cancer) कारण बनू शकते. 52 वर्षांच्या मिशेल डेव्हिससोबत अशीच एक धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. मुरुम सहसा हार्मोन्सशी संबंधित असतात. कधीकधी प्रदूषण आणि घाण यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. परंतु आतापर्यंत अशी घटना उघडकीस आली नाही, ज्यामध्ये मुरुमांमुळे कर्करोग झाल्याचं निदान झालं.

मिशेल डेव्हिसच्या नाकारवर नाकावर मुरुम होते. या पिंपल्सवर तिला कर्करोगाचा आजार असल्याचे दिसून आलं. वास्तविक एप्रिल 2022 मध्ये, तिला नाकारवर एक पिंपल्स आलेला दिसला. तिला वाटलं की, हा केवळ सामान्य मुरुम आहे. म्हणून तिने तो गांभीर्याने घेतला नाही. पण जेव्हा मुरुमांमध्ये वेदना सुरू झाली. तेव्हा तिला तो संशयास्पद वाटला. त्यानंतर ती तपासणीसाठी डॉक्टरकडे गेली. बायोप्सीमध्ये उघडकीस आले की, तिला बेसल सेल कार्सिनोमा आहे, जो त्वचेचा एक प्रकारचा कर्करोग आहे. (हेही वाचा - सावधान! मोबाईलवर 30 मिनिटांपेक्षा अधिक काळ बोलता आहात? वाढू शकतो उच्च रक्तदाब; घ्या जाणून)

कर्करोगापासून मुक्त होण्यासाठी मिशेल डेव्हिसची शस्त्रक्रिया झाली. न्यूझीलंडमधील रहिवासी मिशेलने सांगितले की, तिने मुरुम फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातून काहीही बाहेर आले नाही. परंतु, नंतर त्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यानंतर तिला आपल्याला कर्करोग झाल्याचं समजलं.

कर्करोगावर मात करण्यासाठी तिने त्वरित शस्त्रक्रिया करून घेतली. शस्त्रक्रियेनंतर, मिशेल बरी झाली. परंतु, हा आजार पुन्हा उद्धभवण्याची शक्यता वाढली आहे. असे म्हटले जाते की, काही प्रकरणांमध्ये कर्करोग पुन्हा उद्भवतो.

बेसल सेल कार्सिनोमाची लक्षणे?

या प्रकारचे कर्करोग बेसल पेशींमध्ये तयार होतो. जुन्या पेशी मृत झाल्यानंतर बेसल पेशी नवीन त्वचेच्या पेशी तयार करतात. तथापि, सूर्याच्या संपर्कात येऊन या पेशींचा कर्करोग मर्यादित केला जाऊ शकतो. बेसल सेल कार्सिनोमाची प्रारंभिक लक्षणे काय आहेत ते जाणून घेऊयात...

Disclaimer: लेखात नमूद केलेल्या टिप्स आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत. यास व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून मानले जाऊ नये. कोणताही फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञांचा सल्ला घ्या.