Happy Maharana Pratap Jayanti 2022 Wishes: महाराणा प्रताप जयंती निमित्त शानदार WhatsApp Messages, Facebook Greetings, Quotes, HD Images, GIFs आणि Wallpapers च्या माध्यमातून द्या शुभेच्छा!

आपली वीरता, हुशारी आणि धाडसासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराणा प्रताप यांचे नाव इतिहासाच्या पानांवर कोरले गेले आहे.

Representational Image (Photo Credits: Wikimedia Commons)

देशभरात आज महाराणा प्रताप जयंती साजरी केली जात आहे. आपली वीरता, हुशारी आणि धाडसासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराणा प्रताप यांचे नाव इतिहासाच्या पानांवर कोरले गेले आहे. तर प्रत्येक वर्षी महाराणा प्रताप यांची जयंती साजरी केली जात असून आज 481वी जयंती आहे. मेवाडचे 13वे राजपूत राजा महाराणा प्रताप यांचा जन्म 1540 रोजी एका हिंदू राजपूत परिवारात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव उदय सिंह द्वितिय आणि आईचे नाव जयवंता बाई असे होते. महाराणा प्रताप एक वीर राजपूत योद्धा आणि उत्तम युद्ध रणनीतिकार होते.

महाराणा प्रताप यांची जयंती हिंदू पंचांगानुसार जेष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेच्या तिथीला साजरी केली जाते. मात्र इंग्रजी कॅलेंडर नुसार त्यांचा जन्म 9 मे 1540 रोजी झाला होता. याच त्यांची जयंती साजरी केली जात असून या खास दिवसानिमित्त महाराणा प्रताप जयंती निमित्त शानदार WhatsApp Messages, Facebook Greetings, Quotes, HD Images, GIFs आणि Wallpapers च्या माध्यमातून द्या

                     Maharana Pratap Jayanti messages (Photo Credits: File Image)

                    Maharana Pratap Jayanti messages (Photo Credits: File Image)

                      Maharana Pratap Jayanti messages (Photo Credits: File Image)

                       Maharana Pratap Jayanti messages (Photo Credits: File Image)

                      Maharana Pratap Jayanti messages (Photo Credits: File Image)

महाराणा प्रताप यांनी कधीच मुघलांचा कोणताच प्रस्ताव स्विकार केला नाही. त्यांनी नेहमीच मुघल सम्राट अकबर सोबत संघर्ष केला. इतिहासकारांच्या मते, जेव्हा एकदा अकबर याने जागीदार बनवण्याची संधी दिली तेव्हा मुघल शासकांच्या समोर आत्मसमर्पण करण्यास विरोध केला होता. त्यानंतर हल्दीघाटीमध्ये युद्धा सुरु झाले.

मुघल बादशाह अकबर आणि महाराणा प्रताप यांच्या मध्ये 18 जून 1576 मध्ये युद्ध सुरु झाले होते. या युद्धासाठी अकबर जवळ 80 हजारांहून अधिक सैनिक होते. तर महाराणा प्रताप फक्त 20 हजार सैनिकांच्या फौजेसह युद्धाच्या मैदानात उतरले होते. असे म्हटले जाते की, या युद्धा ना अकबरचा विजय झाला ना महाराणा प्रताप यांचा पराभव झाला होता.